Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
२११ एकशत्रुवधेनैव शूरो गच्छति विश्रुतिम् ॥ ५॥१३४।२३
एका शत्रूचा वध करितांच शूराची प्रसिद्धि होत असते. २१२ एकः शत्रुने द्वितीयोऽस्ति शत्रुः ___ अज्ञानतुल्यः पुरुषस्य राजन् ।। १२।२९७।२८
मनुष्याचा एकच शत्रु आहे, अज्ञानासारखा दुसरा कोणताच शत्रु नाही. २१३ एकस्मिन्नेव जायते कुले क्लीबमहाबलौ। ___ फलाफलवती शाखे यथैकस्मिन्वनस्पतौ ॥ ५॥३३ एकाच वृक्षावर ज्याप्रमाणे फळांनी भरलेली व फलरहित अशा दोनहि प्रकारच्या खांद्या असतात, त्याप्रमाणे एकाच कुळांत अति बलिष्ठ व अत्यंत दुर्बळ पुरुष जन्माला येतात. २१४ एकस्मिन्नेव पुरुषे सा सा बुद्धिस्तदा तदा ।
भवत्यकृतधर्मत्वात् सा तस्यैव न रोचते ॥१०३१३ मनावर धर्माचा संस्कार झालेला नसल्यामुळे एकाच मनुष्याच्या ठिकाणी समयानुरूप निरनिराळे विचार उत्पन्न होतात, व पुढे ते त्याचे त्यालाच आवडेनासे होतात. २१५एकान्ततोन विश्वासःकार्यो विश्वासघातकैः॥१२॥१३९।२८
विश्वासघात करणाऱ्यांवर पूर्ण विश्वास टाकू नये. २१६ एकान्तेन हि विश्वासः कृत्स्नो धर्मार्थनाशकः । ____ अविश्वासश्च सर्वत्र मृत्युना च विशिष्यते ॥ १२१८०१०
कोणावरहि सर्वथा विश्वास ठेविल्याने धर्म व अर्थ यांचा नाश होतो. उलट, कोणाचाच विश्वास न धरणे हे मरणापेक्षा दुःखदायक होय. २१७ एकान्तेन हि सर्वेषां न शक्यं तात रोचितुम् ॥१२॥८९।१९
कोणतीहि गोष्ट सर्वांना सर्वथा आवडणे शक्य नाही. २१८ एतज्ज्ञानं विदुर्विप्रा ध्रुवमिन्द्रियधारणम् ॥ ५।६९।२० खरोखर इंद्रिये ताब्यात ठेवणे यालाच ज्ञाते पुरुष ज्ञान असे म्हणतात.
For Private And Personal Use Only