Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२२)
महापुराण
(२५-११४
निरञ्जनो जगज्ज्योतिनिरुक्तोक्तिनिरामयः । अचलस्थितिरक्षोभ्यः कूटस्थः स्थाणुरक्षयः ॥११४ अग्रणी मणीर्नेता प्रणेता न्यायशास्त्रकृत् । शास्ता धर्मपतिर्षर्यो धर्मात्मा धर्मतीर्थकृत् ॥ ११५ वृषध्वजो वृषाधीशो वृषकेतुर्वृषायुधः । वृषो वृषपतिर्भर्ता वृषभाङ्को वृषोद्भवः ॥ ११६
निरञ्जन- अञ्जन कर्ममलकलङ्क निघून गेल्यामुळे प्रभु निरञ्जन झाले. अर्थात् ते भावकर्म, द्रव्यकर्म, नोकर्म यांनी रहित झाले आहेत ॥ ३०॥ जगज्ज्योति- सगळ्या लोकात व अलोकातही केवलदर्शन नामक डोळा ज्यांचा पहात असल्यामुळे प्रभु जगज्ज्योति आहेत ॥३१॥ निरुक्तोक्ति- निरुक्त- निश्चययुक्त उक्ति- पूर्वापरविरोधदोषरहित वचन प्रभु बोलतात म्हणून ते निरुक्तोक्ति आहेत ॥ ३२ ।। निरामय- नाहीसा झाला आहे आमय रोग ज्यांचा असे प्रभु रोगरहित आहेत ॥ ३३ ॥ अचलस्थिति- अनंतकाल गेला तरी प्रभु स्वस्थानातच मुक्तीमध्ये स्थिर राहतात ।। ३४ ॥ अक्षोभ्य- प्रभूना चारित्रापासून ढळविणे कोणालाही शक्य नाही म्हणून प्रभु अक्षोभ्य आहेत. अथवा अक्षेण म्हणजे केवलज्ञानाने उभ्यतेप्रभु पूर्णतेस प्राप्त झाले आहेत म्हणून ते अक्षोभ्य आहेत ।। ३५॥ कूटस्थ- कूटे त्रैलोक्याच्या शिखराग्रावर-मोक्षस्थानी प्रभु विराजमान झाले आहेत. म्हणून ते कूटस्थ किंवा ते प्रभु आपल्या केवलज्ञानापासून च्युत होत नाहीत व नवीन कांही वेगळा स्वभाव उत्पन्न होत नाही तर त्यांचे केवलज्ञान स्थिर व एक स्वभावाचे राहते ।। ३६ ।। स्थाणु- जगाचा प्रलय झाला तरी ते स्थिर राहतात ॥ ३७ ।। अक्षय- प्रभु अक्षय आहेत. अथवा अक्ष-इन्द्रिये ज्याकडे प्रभु कधीही जात नाहीत अर्थात् ते नेहमी केवलज्ञान स्वभावातच राहतात ।। ३८ ॥
अग्रणी- जो आपणास त्रैलोक्यावर नेतो अर्थात् जो त्रैलोक्यात श्रेष्ठ होतो अशा त्या प्रभूला अग्रणी म्हणतात ।। ३९ ।। ग्रामणी- मोक्षपदाकडे नेणारा किंवा सिद्धसमूहाला नेणारा अर्थात् सिद्धश्रेष्ठ ॥ ४० ॥ नेता- प्रभूनी जिनधर्माला जगापुढे आणले. म्हणून ते नेता आहेत ॥ ४१ ॥ प्रणेता- सष्टीला-जगाला सन्मार्ग दाखविणारा ॥ ४२ ॥ न्यायशास्त्रकृत- पूर्वापर विरोधरहित अशा आगमाला उत्पन्न करणारे-रचणारे प्रभ ॥ ४३ ।। शास्ता-धर्म व अधर्माचे स्वरूप सांगणारे प्रभु जिनेश्वर हे शास्ता खरे गुरु होत ॥ ४४ ॥ धर्मपति- चारित्र, रत्नत्रय, क्षमादिक दहा धर्म, जीवांचे रक्षण करणे किंवा वस्तूंचा स्वभाव यांना धर्म म्हणतात. यांचा जो प्रभु त्याला अर्थात् जिनेन्द्राला धर्मपति म्हणावे ॥ ४५ ॥ धर्म्य- हितकर धर्माचरण करणारा ॥ ४६ ॥ धर्मात्मा- उत्तम क्षमादिदशधर्म हाच आत्मस्वभाव मानून तसे वागणारा ।। ४७ ॥ धर्मतीर्थकृत रत्नत्रय- सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान व सम्यक्चारित्र हे संसारसागर तरून जाण्याचा उपाय असल्यामुळे त्यास धर्मतीर्थ म्हणतात. त्याचा उपदेश प्रभुंनी भव्यांना केला म्हणून ते धर्मतीर्थकर होत ॥ ४८ ।।
वृषध्वज- ज्यांच्या पताकेवर बैलाचे चिह्न आहे अशा प्रभूना वृषभध्वज म्हणतात ॥ ४९ ।। वृषाधीश- अहिंसाधर्माचे प्रभु स्वामी आहेत. म्हणून ते वृषाधीश होत ॥ ५० ॥ वृषकेतु- पुण्य हे ज्यांचे चिन्ह आहे असे प्रभु वृषकेतु होत ॥ ५१ ॥ वृषायुध- धर्म हा कर्म
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org