Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२०)
महापुराण
(२५-१११
दिव्यभाषापतिदिव्यः पूतवाक्प्तशासनः । पूतात्मा परमज्योतिधर्माध्यक्षो वमीश्वरः ॥ १११ श्रीपतिर्भगवानहन्नरजा विरजाः शुचिः । तीर्थकृत्केवलीशानः पूजार्हः स्नातकोऽमलः ॥ ११२
आहात ।। ९९ ॥ त्रिजगत्परमेश्वर- आपण त्रैलोक्याचे उत्कृष्ट ईश्वर स्वामी आहात. अथवा त्रैलोक्याची जी परा उत्कृष्ट मा लक्ष्मी तिचे आपण ईश्वर आहात ।। १००॥
दिव्यभाषापति- प्रभुंच्या मुखातून जी भाषा निघते तिला दिव्यभाषा म्हणतात. प्रभु अठरा महाभाषा व सातशे क्षुल्लक भाषा यांचे स्वामी आहेत ।। १॥ दिव्य- भगवान् सर्वार्थसिद्धीहून येथे जन्मले म्हणून ते दिव्य आहेत ॥२॥ पूतवाक्- भगवंताची भाषा पवित्र असते, व ती अनर्थक, श्रुतिकटु इत्यादि दोषांनी रहित असते ॥ ३ ।। पूतशासन- भगवंताचे मत पूर्वापर विरोधरहित आणि हितकारक अर्थात् पवित्र आहे ॥ ४॥ पूतात्मा- भगवंताचा आत्मा पवित्र अर्थात् कर्मकलंकरहित असतो. भगवान् पवित्र स्वभावाचे असतात. अथवा पू: म्हणजे पवित्र करणारे सिद्ध परमेष्ठी त्यांची ता म्हणजे अनन्त चतुष्टयरूपी जी लक्ष्मी तिने युक्त आहे. आत्मा ज्यांचा असे जे प्रभु जिनेश्वर ते पूतात्मा होत ॥ ५ ॥ परमज्योति- परम उत्कृष्ट केवलज्ञानरूपी ज्योतीने भगवान् युक्त आहेत ॥ ६ ॥ धर्माध्यक्ष- प्रभु धर्म म्हणजे चारित्र त्याचे अध्यक्ष-अधिकारी आहेत व ते धर्माचा ध्वंस नाश कोणालाही करू देत नाहीत. अथवा धर्माधौ--धर्मचिन्तनात प्रभूची इन्द्रिये, ज्ञान व आत्मा नेहमी तत्पर असतात म्हणून ते धर्माध्यक्ष आहेत ॥ ७॥ दमी श्वर- दमप्रशम-क्रोधादिकषायांचा अभाव व इन्द्रियनिग्रह याला दम म्हणतात. हा दम ज्यांच्यात आहे असे साधु ते दमी होत व त्यांचे प्रभु ईश्वर स्वामी आहेत ॥८
__ श्रीपति- भगवान् अभ्युदयलक्ष्मी-विशाल राज्य, ऐश्वर्य, भोगाचे पदार्थ इत्यादिक संपत्ति व अनन्तज्ञान सुख शक्त्यादि गुणांची प्राप्ति ही निःश्रेयस-मोक्षलक्ष्मी या दोन लक्ष्मींचे स्वामी आहेत ।।९॥ भगवान्-- अनंतज्ञान, अशोकवृक्षादि आठ प्रातिहार्ये, वैराग्य, महातपश्चरण, मोक्ष यांना भग म्हणतात हे ज्यांना प्राप्त झाले आहेत असे प्रभु आदिजिनेश भगवान् होत ॥१०॥ अर्हन्- इन्द्रादिकांनी केलेल्या व इतर हरिहरादिकातून आढळून न येणाऱ्या पूजेला प्रभु प्राप्त झाले म्हणून ते अर्हन होत. अथवा अकाराने मोहनीय कर्म रज, शब्दाने ज्ञानावरण व दर्शनावरण कर्म, व रहस शब्दाने अन्तराय कर्म या चार घातिकर्मांचे प्रभूनी हनन नाश केला म्हणून प्रभु अर्हन या योग्य नावाचे धारक बनले. या चार कर्मांचा नाश करून इन्द्रादिकाकडून अर्हणाला पूजनाला प्राप्त झाले म्हणून जिनेश्वराना अर्हन् म्हणतात ॥ ११॥ अरजा- प्रभु ज्यांनी रजस् ज्ञानावरण व दर्शनावरण ही दोन कर्मे नष्ट केली असे आहेत ॥ १२॥ विरजा- ज्यांची वरील दोन कर्मे नाहीतशी झाली असे प्रभू विरजा झाले आहेत ॥ १३ ॥ शुचि- प्रभु निर्मल आहेत, पवित्र आहेत. अथवा अत्युत्कृष्ट ब्रह्मचर्याचे प्रभूनी पालन केले व माझा आत्मा शुद्ध आहे आत्मस्वरूपज्ञ व पवित्र तीर्थ आहे. अशा निर्मल भावनारूप जलाने त्यांनी आपले अन्तरंग शरीर शुद्ध केले म्हणून ते शुचि-परमपवित्र झाले आहेत. अथवा आठ कर्मरूपी लाकडे त्यांनी जाळून टाकली म्हणून ते शुचि अग्निस्वरूप आहेत. अथवा जन्मापासून ते मलमूत्ररहित आहेत
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org