Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१८)
महापुराण
(२५-१०७
प्रशान्तारिरनन्तात्मा योगी योगीश्वराचितः । ब्रह्मविद्ब्रह्मतत्त्वज्ञो ब्रह्मोद्याविद्यतीश्वरः ।। १०७ शुद्धो बुद्धः प्रबुद्धात्मा सिद्धार्थः सिद्धशासनः। सिद्धसिद्धान्तविद्ध्येयःसिद्धसाध्यो जगद्धितः ॥१०८
भगवान् पृथ्वीवर असलेल्या भव्यजीवाना उपदेश करण्याकरिता विहार करतात तेव्हां प्रभूचे धर्मचक्र भव्यांच्या सेनेच्या पुढे आकाशातून जात असते. म्हणून प्रभु धर्मचक्री आहेत ।। ६४ ।। दयाध्वज- दया ही प्रभूची ध्वजा आहे. अथवा दयेच्या मार्गात प्रभु योग्याना प्रत्यक्ष होतात म्हणून ते दयाध्वज आहेत ॥ ६५ ।।
प्रशान्तारि- ज्यांचे कर्म शत्रु उपशान्त झाले, नाश पावले असे प्रभु प्रशान्तारि होत ॥६६॥ अनन्तात्मा- अनन्त अशा केवलज्ञानाने युक्त असा आत्मा ज्यांचा आहे असे प्रभु अनन्तात्मा या नावाने संबोधले जातात ॥६७॥ योगी- आपल्या आत्मस्वरूपाकडे आपल्या मनाला प्रभूनी एकाग्र केले. म्हणून ते योगी आहेत. अथवा तत्त्वज्ञानाकडे आपल्या मनाचा उपयोग ज्यानी लावला आहे असे प्रभु योगी होत ।। ६८॥ योगीश्वराचित- यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधि हे आठ योग ज्याना आहेत ते योगी होत. त्यांचे ईश्वर जे स्वामी गणधरदेवादिक त्यानी ज्याची पूजा केली आहे असे भगवान् योगीश्वराचित--पूजित आहेत ।। ६९ ॥ ब्रह्मवित्- ब्रह्म-आत्मा त्याच्या स्वरूपाला भगवान् जाणतात म्हणून ते ब्रह्मवित् आहेत ॥ ७० ॥ ब्रह्मतत्त्वज्ञ- ब्रह्म-आत्मा, ज्ञान, दया, कामनिग्रह याचे स्वरूप उत्तम जाणणारे प्रभु ब्रह्मवित् आहेत ।। ७१ ।। ब्रह्मोद्यावित्- ब्रह्माविषयीच्या अर्थात् केवलज्ञानरूपी आत्मविद्येच्या कथांना प्रभु जाणतात म्हणून ते ब्रह्मोद्यावित् आहेत ॥ ७२ ॥ यतीश्वर- जे रत्नत्रयात यत्न करतात ते साधु यति होत. अशा यतींचे जिनेश्वर स्वामी आहेत म्हणून ते यतीश्वर होत ।। ७३ ॥
__ शुद्ध- क्रोधादिकषायानी रहित ॥ ७४ । बुद्ध- केवलज्ञानरूप बुद्धि ज्यांना आहे असे भगवान् बुद्ध होत ।। ७५ ॥ प्रबुद्धात्मा- केवलज्ञानाने सहित आत्मा-जीव ज्यांचा आहे असे भगवान् प्रबुद्धात्मा होत ।। ७६ ॥ सिद्धार्थ- धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ ज्याना सिद्ध झाले आहेत असे प्रभु सिद्धार्थ होत. अथवा सिद्ध पर्यायाशिवाय प्रभूचे दुसरे कोणतेही प्रयोजन नसते अथवा सिद्ध म्हणजे विद्वान् त्यांचे प्रसिद्ध अर्थ जीवादिक सात तत्त्वे व पापपुण्ये मिळून नऊ पदार्थ हे प्रभूपासून विद्वानाना सिद्ध झाले ॥७७॥ सिद्धशासन- ज्याचे शासन नित्य व प्रसिद्ध असे झाले आहे ॥७८ ॥ सिद्धसिद्धान्तविद्- परिपूर्ण, लोकालोक स्वरूप प्रकाशक-प्रतिपादक द्वादशांगरूप शास्त्राला प्रभु जाणतात म्हणून ते सिद्ध सिद्धान्तवित् आहेत ॥ ७९ ॥ ध्येय- वर्णी व योगी यांच्याकडून प्रभु ध्येय-आराध्य आहेत ॥ ८० ॥ सिद्धसाध्य- हे भगवन्ता आपली सर्व साध्ये सिद्ध झाली आहेत. अथवा सिद्धनामक देवानी आपण आराधण्यास योग्य आहात ॥८१॥ जगद्धित- आपण सर्व जगाचे हित करणारे आहात ।। ८२॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org