Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१६)
महापुराण
(२५-१०३
विश्वकर्मा जगज्ज्येष्ठो विश्वमूतिजिनेश्वरः। विश्वदृग्विश्वभूतेशो विश्वज्योतिरनीश्वर ॥ १०३ जिनो जिष्णुरमेयात्मा विश्वरीशो जगत्पतिः। अनतजिदचिन्त्यात्मा भव्यबन्धुरबन्धन ॥१०४
केली म्हणून आपण विधि आहात ॥ २७ ॥ वेधा- धर्मसृष्टि उत्पन्न केली म्हणून प्रभु वेधा आहेत ॥ २८ ॥ शाश्वत- निरंतर असणारा ॥ २९ ॥ विश्वतोमुख- विश्वत: चारीही दिशांत मुख धारण करणारे. केवलज्ञानयुक्त भगवंताला सर्व जीव आपआपल्या समुख पाहतात असा या शब्दाचा भाव आहे. अत्यंत निर्मलता असल्यामुळे भगवान् चार मुखाचे वाटतात. अथवा विश्वतोमुख पाण्याला म्हणतात. त्याचा मल नाहीसा करण्याचा स्वभाव आहे. तोच स्वभाव भगवंताचाही आहे. कारण ते असंख्य जन्माच्या पातकाचे क्षालन करतात. विषयसुखाची तहान नाहीशी करतात व त्याचा भाव अतिशय प्रसन्न-निर्मल असतो. अथवा विश्व-संसार त्याचा तस्यति-नाश करणारे मुख भगवंताचे आहे. भगवंताच्या मुखदर्शनाने जीव पुनः संसारात उत्पन्न होत नाहीत.
विश्वकर्मा- सर्व कर्मे कष्टदायक आहेत असे मत ज्यांचे आहे असे प्रभु विश्वकर्मा म्हटले गेले आहेत. अथवा विश्व-देवविशेष ज्याची सेवा करितात असे प्रभु विश्वकर्मा आहेत. अथवा असि, मषि, कृषि आदिक सहा कर्मानी उपजीविका करावी असे प्रजेला प्रभूनी राज्य पालन करीत असता सांगितले होते म्हणून ते विश्वकर्मा होत ॥ ३० ।। जगज्ज्येष्ठ- त्रैलोक्यात असलेल्या प्राण्यात प्रभु सर्वश्रेष्ठ आहेत, महान् आहेत व ज्येष्ठ आहेत ॥ ३१॥ विश्वमूर्ति- सर्व विश्व-जगत् ज्याच्या मूर्तीमध्ये-शरीरात आहे असा अथवा सर्व जगताची आकृति ज्यांच्या ज्ञानात झळकत आहे असे प्रभु विश्वमूर्ति होत ॥ ३२॥ जिनेश्वर:- भयंकर भवरूपी वनात अतिशय संकट उत्पन्न करणा-या कर्मशत्रूना जो जिकतो, जो त्यांचा क्षय करतो तो जिन होय. एकदेशाने किंवा पूर्णपणे कर्मशत्रूना ज्यांनी जिंकिले आहे ते जिन होत. सम्यग्दृष्टि, श्रावक, प्रमत्तसंयत, अप्रमत्त, अपूर्वकरण अनिवृत्तिकरण, सूक्ष्मसाम्पराय, उपशान्तकषाय व क्षीणकषाय अशा गुणस्थानातले जे जीव त्यांना जिन म्हणतात. अशा जिनांचे प्रभु स्वामी आहेत. म्हणून त्यांना जिनेश्वर म्हणावे ।। ३३ ॥ विश्वदृक्- सर्वविश्वाला पाहणारे प्रभु विश्वदृक् होत ।। ३४ ॥ विश्वभूतेश- सर्वभूतांचाप्राणिमात्रांचा ईश स्वामी अथवा संपूर्ण भूतांचा व्यन्तरविशेषांचा स्वामी असे प्रभु आहेत अथवा विश्वभूः म्हणजे त्रैलोक्य व त्याची ता म्हणजे लक्ष्मी तिचे जिनेश्वर ईश आहेत, स्वामी आहेत ।। ३५ ॥ विश्वज्योति- सर्व लोकात व अलोकात केवलज्ञानरूपी ज्योति-डोळा ज्यांचा पसरला आहे असे जिनेश्वर ।। ३६ ॥ अनीश्वर- ज्यांच्याहून दुसरा ईश्वर नाही असे जिनेश्वर ते अनीश्वर होत. हे प्रभो आपला कोणी स्वामी नाही, आपण सर्वाचे स्वामी आहात ॥ ३७॥
जिनप्रभूनी कर्मरिपूंना जिंकले अर्थात् कामक्रोधादिदोषांना जिंकून अनन्ताज्ञानादि गुणांनी युक्त झाले ते जिन ॥ ३८॥ जिष्णु- प्रभु जयति म्हणजे सर्वोत्कर्षयुक्त आहेत म्हणून ते जिष्णु होत ॥ ३९ ॥ अमेयात्मा- अमर्याद व लोकालोकाला व्यापणारा आत्मा ज्याचा अशा जिनाला अमेयात्मा म्हणतात ॥ ४० ॥ विश्वरीश- विश्वरी-पृथ्वी तिचा स्वामी अर्थात्
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org