Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२५-१०२)
महापुराण
विश्वदृश्वा विभुर्धाता विश्वेशो विश्वलोचनः । विश्वव्यापी विषिर्वेधाः शाश्वतो विश्वतोमुखः॥
भोक्ता- आपण अनन्तसुखाचा नेहमी उपभोग घेता म्हणून भोक्ता ।। ९॥ विश्वभू-केवलज्ञानाने सर्व जगाला व्याप्त केले आहे म्हणून विश्वभू किंवा ध्यानादिकाच्याद्वारे सर्व ठिकाणी आपण योग्यांना प्रकट होता ॥ १० ॥
__ अपुनर्भव- आपण आता पुनः येऊन जन्म धारण करणार नाहीत म्हणून अपुनर्भव आहात ।। ११॥ विश्वात्मा- विश्वांत जगांत असलेल्या सर्व प्राणिसमूहाला विश्व म्हणतात. अर्थात सर्व प्राणी ज्याला आपल्या आत्म्यासारखे वाटतात तो जिनेश्वर विश्वात्मा होय. जसे आठव्यात असलेल्या धान्याला आठवा म्हणतात तसे विश्वात असलेल्या प्राण्यांना विश्व येथे म्हटले आहे. ते योग्यच आहे अथवा विश्व म्हणजे केवलज्ञान ते आत्मा स्वरूप ज्याचे आहे तो जिनेश्वर विश्वात्मा होय ॥ १२ ॥ विश्वलोकेश- जिनेश्वर त्रैलोक्यात असलेल्या सर्व प्राण्याचे प्रभु आहेत ॥ १३ ॥ विश्वतश्चक्षु- सगळ्या जगात ज्याचा केवलदर्शनरूपी चक्षु आहे डोळा आहे- तो जिनेश्वर विश्वचक्षु होय ॥ १४ ॥ केवलदर्शनरूपी डोळ्याने सर्व जगाला पाहणारे जिनेश्वर विश्वचक्षु आहेत ।। १५ ।। अक्षर- जो क्षरण पावत नाही-नाश पावत नाही तो अक्षर होय. अथवा अक्ष म्हणजे इन्द्रिये, त्याना राति म्हणजे मनासह वश करणारे जिनेश्वर आहेत म्हणून त्याना अक्षर म्हणावे ।। १६ ॥ विश्ववित्जीवादि सहा द्रव्यानी भरलेल्या जगाला जाणणारे जिनेश्वर विश्ववित् आहेत ।। १७ ॥ विश्वविद्येश- केवलज्ञानाला विश्वविद्या म्हणतात. अशा विद्येचे आदिप्रभु ईश- स्वामी आहेत. अथवा श्रुतज्ञानाला विश्वविद्या म्हणतात. तिला जाणणारे जे श्रुतकेवली व गणधरकेवली त्याचे प्रभु आदिजिन ईश-स्वामी आहेत. अथवा विश्वविद्या म्हणजे जैनमतसिद्धान्त व इतर मतांचे सिद्धान्त त्याना विश्वविद्या म्हणतात. त्याचे भगवान् ईश स्वामी आहेत ॥१८॥ विश्वयोनि- सर्व पदार्थांचे उत्पत्तिस्थान किंवा कारण जो आहे तो ॥ १९ ।। अनश्वर- केन्हाही नाश न पावणारा ॥ २० ॥ विश्वदृश्वा आदिभगवंतानी आपल्या ज्ञानरूपी डोळ्याने जगाला पाहिले म्हणून ते विश्वदृश्वा आहेत ॥ २१ ॥ विभु:- विशेषरीतीने मंगल करणारा, जनतेला समृद्ध करणारा, समवसरणसभेत प्रभुत्वाने वास करणारा, केवलज्ञानाने चराचर जाणणारा, जगाला संपत्ति देणारा, वैराग्य झाल्यावर जगाला मी तारीन असा अभिप्राय मनात धारण करणारा, जगताला तारण्यासाठी उत्पन्न झालेला व एका समयात सर्व जगाला जाणणारा तो विभु होय ॥ २२ ॥ धाता-चतुर्गतीत पडलेल्या जीवाला वर काढून मोक्षस्थानी स्थापन करणारा अथवा दयाळूपणाने सूक्ष्म, बादर पर्याप्त, अपर्याप्त, एकेन्द्रिय जीवापासून पंचेन्द्रिय जीवापर्यन्त सर्व जंतूंचे रक्षण करणारा ॥ २३ ॥ विश्वेश:- त्रैलोक्याचा स्वामी ॥ २४ ॥ विश्वलोचनः-सर्व त्रैलोक्यातील प्राण्याना सुखाचा मार्ग दाखविणारा असल्यामुळे डोळयासारखा असलेला ॥ २५ ॥ विश्वव्यापी- केवलज्ञानाने लोकालोकास व्यापणारा अथवा लोकपूरण समुद्धात जेव्हा होतो त्यावेळी प्रभूच्या आत्म्याचे प्रदेश सर्व जगताला व्यापतात. यास्तव या दृष्टीनेही प्रभूचे विश्वव्यापितत्व आहे ॥ २६ ॥ विधि- निर्दोष मोक्षमार्गाची रचना आपण
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org