Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२५-११०)
महापुराण
(१९
सहिष्णुरच्युतोऽनन्तःप्रभविष्णुर्भवोद्भवः । प्रभूष्णुरजरोऽयज्यो भ्राजिष्णु|श्वरोऽव्ययः॥१०९ विभावसुरसम्भूष्णुः स्वयम्भूष्णुः पुरातनः । परमात्मा परञ्ज्योतिस्त्रिजगत्परमेश्वरः ॥ ११०
सहिष्णु- भगवान् क्षमाशील आहेत, क्षमा गुणाचे भाण्डार आहेत ।। ८३ ॥ अच्युत- ते आपल्या स्वरूपापासून च्युत होत नाहीत. ते परमात्मनिष्ठ असतात ॥ ८४ ।। अनन्त- त्यांचा कधीच नाश होत नाही. म्हणूत ते अनन्त आहेत ॥ ८५ ।। प्रभविष्णुअनन्तशक्तीमुळे ते समर्थ आहेत ॥८६ ॥ भवोद्भव- द्रव्यसंसार, क्षेत्रसंसार, कालसंसार, भावसंसार 'व भवसंसार या पाच प्रकारच्या संसारापासून आपला जन्म रहित झाला आहे अथवा या संसारात आपला जन्म सर्वोत्कृष्ट आहे ।। ८७ ॥ प्रभूष्णु- इन्द्र, धरणेन्द्र, नरेन्द्र, चन्द्र, गणीन्द्र-गणधर इत्यादिकावर आपले प्रभुत्व आहे म्हणून आपण प्रभूष्णु आहात।।८८।। अजर-हे प्रभो, आपण वृद्धपणाने रहित आहा म्हणून अजर आहात ।। ८९॥ अयज्य-हे प्रभो, आपले स्वरूप कोणाकडून जाणणे शक्य नसल्यामुळे आपण कोणाकडून पूजिले जाणे शक्य नाही ॥ ९०॥ भ्राजिष्णु- कोटयवधि चन्द्रसूर्यापेक्षाही आपण अधिक कान्ति धारण करीत आहा ॥ ९१॥ धीश्वर- आपण केवलज्ञानरूपी बुद्धीचे स्वामी आहा ॥ ९२ ।। अव्यय- द्रव्याथिकनयाने आपला नाश होत नाही म्हणून आपण अव्यय आहा. अथवा सिद्धपर्याय प्राप्त झाल्यावर आपला नाश होत नाही किंवा आपल्या प्रदेशात वाढ किंवा कमतरता नाही म्हणून आपण अव्यय आहा ॥ ९३ ॥
विभावसु- कर्मरूपी लाकडे भस्म करण्यास आपण विभावसु-अग्निस्वरूपाचे आहात. मोहान्धकार नष्ट करण्यास आपण विभावसु सूर्यासारखे आहात. लोकांच्या नेत्रावर आपण अमृताची वृष्टि करणारे असल्यामुळे चंद्रासारखे आहात. ज्ञानावरणादि कर्मसृष्टीचा आपण प्रलय नाश केला म्हणून आपण रुद्रासारखे आहात. आत्मा व कर्मबन्धन याना आपण वेगळे करण्यास भेदज्ञानरूप आहात. विभा- आपले विशिष्ट तेज हेच आपले वसु, धन आहे. अर्थात् केवलज्ञानरूपी धनाचे आपण धारक आहात. अथवा विशिष्ट जी कान्ति तिने युक्त अशी वसुरत्ने-सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान व सम्यक्चारित्ररूपी रत्ने आपण धारण करीत आहात म्हणून आपण विभावसु आहात. घातिकर्माच्या क्षयामुळे प्राप्त झालेल्या तेजाने आपण वसुनामक देवांना विभा--कान्तिरहित केले आहे. अथवा विशिष्ट भा-कान्तीचे जिने अवन--पालन केले आहे अशी ज्याची माता आहे असे आपण आहा म्हणून आपण विभावसु आहात. अथवा विभाव रागद्वेष मोहादि परिणामाना स्यति आपण नष्ट करता म्हणून आपण विभावसु आहात ।। ९४ ॥ असम्भूष्णु- आपण आता पुनः संसारात उत्पन्न होणार नाहीत म्हणून असम्भूष्णु आहात ॥ ९५ ॥ स्वयम्भूष्णु- स्वतः आपण होऊन उत्पन्न झालेले आहात ।। ९६ ॥ पुरातन-पुरा-पूर्वी युगाच्या आरंभी आपला जन्म झाला आहे म्हणून आपण पुरातन आहात ॥ ९७॥ परमात्मा- परमउत्कृष्ट केवलज्ञानी आत्मा ज्यांचा आहे असे आपण आहात ॥ ९८ ॥ परञ्ज्योति- आपले ज्योति ज्ञानरूपी नेत्र उत्कृष्ट आहे म्हणून आपण परञ्ज्योति आहात, आलोकान्त नेत्ररूप
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org