Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
३३
१९३ उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् । ____ आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥६॥३०१५ ___ मनुष्याने आपण होऊन आपला उद्धार करावा. आपण आपला नाश करूं नये. कारण, प्रत्येक मनुष्य आपणच आपला बंधु ( हितकर्ता) किंवा आपणच आपला शत्रु होतो. १९४ उद्यच्छेदेव न नमेदुयमो ह्येव पौरुषम् ।
अप्यपर्वणि भज्येत न नमेतेह कस्यचित् ॥१२॥१३३।१० मानी पुरुषाने नेहमी ताठ (बाणेदारपणानें ) असावे कधी कोणापुढे वाकू नये. ताठपणाने मोडावें पण ( कोणापुढेहि ) वांकू नये. न वांकणे हाच खरा मानीपणा. १९५ उद्यम्य शस्त्रमायान्तमपि वेदान्तगं रणे ।
निगृह्णीयात्स्वधर्मेण धर्मापेक्षी नराधिपः ॥ १२॥५६२९ रणांगणांत शस्त्र उपसून धावून येणारा शत्रु वेदान्तविद्यापारंगत असला तरी त्याचा, धर्माची आस्था बाळगणाऱ्या राजाने धर्मयुद्ध करून मोड करावा. १९६ उन्मत्ता गौरिवान्धा श्रीः कचिदेवावतिष्ठते ॥ ५॥३९।६६
उन्मत्त गाईप्रमाणे, अविचारी लक्ष्मी कोठे तरी रहात असते ! १९७ उपस्थितस्य कामस्य प्रतिवादो न विद्यते।
__अपि निमुक्तदेहस्य कामरक्तस्य किं पुनः॥ ५।३९।४६ प्राप्त झालेल्या विषयाचा त्याग, देहाची पर्वा न करणाऱ्या जीवन्मुक्ताच्याहि हातून होणे शक्य नाही. मग विषयलंपट पुरुषाची गोष्ट कशाला पाहिजे ! १९८ ऊधश्छिन्द्यात्तु यो धेन्वाः क्षीरार्थी न लभेत्पयः।
. एवं राष्ट्रमयोगेन पीडितं न विवर्धते ॥१२७११६
दुधाच्या आशेनें जो गाईची कांस कापील त्याला दूध कधीच मिळणार नाही. त्याचप्रमाणे अयोग्य रीतीने कर वैगेरे लादून राष्ट्राला पीडा दिली असतां राष्ट्राचा उत्कर्ष होत नाही.
म. भा. ३
For Private And Personal Use Only