Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१७९ इन्द्रियाण्येव संयम्य तपो भवति नान्यथा॥३॥२११११८ ___ इंद्रियांचें संयमन केल्यानेच तपश्चर्या घडते, नाही तर घडत नाही. १८० इष्टं च मे स्यादितरच न स्या
देतत्कृते कर्मविधिः प्रवृत्तः । इष्टं त्वनिष्टं च न मा भजेते
त्येतत्कृते ज्ञानविधिः प्रवृत्तः ॥ १२।२०१।११ मला इष्ट गोष्टी तेवढ्या घडाव्या व अनिष्ट टळाव्या यासाठी कर्मकांडाची प्रवृत्ति आहे. इष्ट व अनिष्ट या दोहोंचाहि लेप मला न लागावा यासाठी ज्ञानकांड आहे. १८१ इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः ।
तैदत्तानप्रदायभ्यो यो भुड़े स्तेन एव सः॥ ६।२७/१२ (श्रीकृष्ण म्हणतात ) यज्ञाने तृप्त झालेले देव तुम्हांला ( यज्ञ करणाऱ्यांना ) इच्छित भोग देतील. त्यांनी दिलेल्या त्या भोगांचा त्यांना दिल्याशिवाय जो उपभोग घेतो तो चोरच म्हटला पाहिजे. १८२ इह प्राज्ञो हि पुरुषः स्वल्पमप्रियामिच्छति ॥ ५।१३५।१७
[विदुला संजयाला म्हणते ] इहलोकी शहाण्या मनुष्याला अल्पस्वल्पाने संतोष होत नाही. १८३ इह लोके हि धनिनां स्वजनः स्वजनायते ।
स्वजनस्तु दरिद्राणां जीवतामपि नश्यति ॥१२॥३२११८८ या जगांत धनवान् लोकांचे आप्तेष्ट आप्तेष्टांसारखे वागतात. दरिद्री मनुष्याला मात्र आप्तेष्ट असून नसल्यासारखे होतात. . १८४ ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति ।
भ्रामयन्सर्वभूनानि यन्त्रारूढानि मायया ॥६।४।६१ (श्रीकृष्ण म्हणतात ) अर्जुना, परमेश्वर सर्व भूतांच्या अंतर्यामी वास करतो, व आपल्या मायेच्या योगाने यंत्राने चढविलेल्या [ कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे ] सर्व भूतांना नाचवीत असतो.
For Private And Personal Use Only