Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
२९
१६७ आशां महत्तरां मन्ये पर्वतादपि सद्रुमात् ।
आकाशादपि वा राजन्नप्रमेयैव वा पुनः ॥ १२॥१२५/६ (युधिष्ठिर भीष्मांना म्हणतो ) राजा, मला वाटते की वृक्षाच्छादित पर्वतापेक्षा आणि आकाशापेक्षांहि आशा ही मोठी आहे. खरोखर तिच्या मोठेपणाला सीमाच नाही ! १६८ आशीविषैश्च तस्याहुः सङ्गतं यस्य राजभिः॥१२॥८२।२४
जो राजेलोकांच्या समागमांत राहतो तो खरोखर सर्वांच्याच सहवासात राहतो. १६९ आश्चर्याणामनेकानां प्रतिष्ठा भगवान् रविः ॥ १२॥३६२।२
भगवान सूर्यनारायण अनेक चमत्कारांचे आश्रयस्थान आहे. १७० आश्रमांस्तुलया सर्वान्धृतानाहुर्मनीषिणः ।
एकतश्च त्रयो राजन् गृहस्थाश्रम एकतः ।। १२।१२।१२ एकीकडे वाकीचे तीन आश्रम व एकीकडे एकटा गृहस्थाश्रम ठेवला तरी बरोबरी होईल असे ज्ञाते लोक म्हणतात. १७१ इच्छतोरत्र यो लाभः स्त्रीपुंसोरमृतोपमः ।
अलाभश्चापि रक्तस्य सोऽपि दोषो विषोपमः।।१२।३२०६९ परस्परांची इच्छा करणाऱ्या स्त्रीपुरुषांना परस्परांचा लाभ होईल तर तो अमृततुल्य असतो, आणि न होईल तर ते दुःखहि विषतुल्यच होय. १७२ इज्याध्ययनदानानि तपः सत्यं क्षमा दमः ।
अलोभ इति मार्गोऽयं धर्मस्याष्टविधः स्मृतः॥ ५।३५/५६ यज्ञ, अध्ययन, दान, तप, सत्यपालन, क्षमाशीलता, इंद्रियनिग्रह आणि निर्लोभताः असा आठ प्रकारचा धर्मप्राप्तीचा मार्ग सांगितलेला आहे.
For Private And Personal Use Only