Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
३०
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१७३ इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंहयेत् । _ विभेत्यल्पश्रुताद्वेदो मामयं प्रहरिष्यति ॥ १।१।२६८
[ रामायण महाभारतादि ] इतिहास आणि पुराणे यांच्या अभ्यासाने वेदाध्ययनाची 'पूर्तता करावी. कारण, अर्धवट शिकलेल्या मनुष्याविषयी वेदाला अशी धास्ती वाटते की, हा माझ्यावर प्रहार करील. (म्हणजे अर्थाचा अनर्थ करून दुरुपयोग करील.) १७४ इत्यर्थमिष्यतेऽपत्यं तारयिष्यति मामिति ॥११५९१४
मनुष्याला अपत्य एवढ्याकरितां हवे असते की त्याने आपल्याला [ नरकापासून ] तारावें. १७५ इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥ ६२७३४ इंद्रिये आणि त्यांचे विषय यांच्यामधील प्रीति व द्वेष ही ठरलेली आहेत. त्यांच्या ताब्यांत मनुष्याने जाऊ नये. कारण ते त्याचे शत्रु होत. १७६ इन्द्रियाणामनुत्सर्गो मृत्युनापि विशिष्यते । ___अत्यर्थ पुनरुत्सर्गो सादयेदैवतानपि ।। ५।३९।५३
इंद्रियांचा आत्यंतिक निरोध मरणापेक्षांहि दुःसह होय, उलट तीच अजीबात मोकळी सोडली असतां देवतांचा देखील नाश करतील. १७७ इन्द्रियाणां प्रसङ्गेन्न दोषमछंत्यसंशयम् । ___ संनियम्य तु तान्येव सिद्धिमानोति मानवः।। १२२३२३।८
मनुष्य इंद्रियांच्या नादी लागला म्हणजे त्याच्या हातून निःसंशय पापाचरण 'घडते. परंतु तीच ताव्यांत ठेवल्याने सिद्धि ( मोक्ष ) प्राप्त करून घेतो. १७८ इन्द्रियाण्येव तत्सर्वं यत्स्वर्गनरकावुभौ। .
निगृहीतविसृष्टानि स्वर्गाय नरकाय च ।। ३।२११११९ स्वर्ग व नरक म्हणून जे काही आहे ते सर्व इंद्रियेच होत. कारण इंद्रिये, आंवरून धरल्याने स्वर्गाला, आणि मोकळी सोडल्याने नरकाला, कारण होत असतात.
For Private And Personal Use Only