Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२८
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१६१ आपदेवास्य मरणात्पुरुषस्य गरीयसी।
श्रियो विनाशस्तद्धयस्य निमित्तं धर्मकामयोः।।५।७२।२७ द्रव्यनाश हे मनुष्याला मरणापेक्षाहि अधिक मोठे संकट होय. कारण, त्याचा धर्म व काम या दोनहि पुरुषार्थाचे साधन द्रव्य हे आहे. १६२ आभ्यन्तरं भयं रक्ष्यमसारं बाह्यतो भयम्।।१२।१०७।२८
आपापसांतील भयाचे प्रथम निरसन केले पाहिजे. कारण, बाह्य लोकांपासून उत्पन्न होणारी भीति ( आपसांतील भीतीपेक्षा ) निःसार असते. १६३ आर्तिरार्ते प्रिये प्रीतिरेतावन्मित्रलक्षणम् ।
विपरीतं तु बोद्धव्यमरिलक्षणमेव तत् ।। १२।१०३१५० मित्र पीडित झाला असतां आपण पीडित होणे आणि तो आनंदित असतां आनंदित होणे हे मित्राचे लक्षण होय. आणि याच्या उलट स्थिति असणे हे शत्रूचेच लक्षण जाणावें. १६४ आर्यण हि न वक्तव्या
__ कदाचित्स्तुतिरात्मनः ॥ ७/१९५।२१ - आर्य मनुष्याने केव्हांहि आत्मस्तुति करूं नये. १६५ आलस्यं मदमोहौ च चापलं गोष्ठिरेव च ।
स्तब्धता चाभिमानित्वं तथाऽत्यागित्वमेव च
एते वै सप्त दोषाः स्युः सदा विद्यार्थिनां मताः॥५।४०५ आळस, गर्व व मोह, चंचलपणा, जनसमुदायांत जाणे, उद्धटपणा, अभिमान आणि लोभ हे विद्यार्थ्यांचे नेहमी सात दोष ( त्याज्य ) होत. १६६ आशा कालवती कुर्यात्कालं विघ्नेन योजयेत् ।
विघ्नं निमित्ततो ब्रूयानिमित्तं चापि हेतुतः ॥१११४०।८८ [प्रसंगविशेषीं शत्रूला ] आशाहि दाखवावी पण तिला काळाची मर्यादा सांगावी. आणि तो काळ आला म्हणजे ती सफल होण्याच्या मार्गात विघ्नं उपस्थित करावी. त्या विघ्नांचेंहि काहीतरी कारण सांगावे. आणि त्या कारणाच्याहि मूळाशी कांहीं मतलब असावा.
For Private And Personal Use Only