Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२६
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१४९ आत्मार्थे संततिस्त्याज्या
राज्यं रत्नं धनानि च ॥ १२॥१३८।१७९ स्वतःकरितां संततीचा, राज्याचा, रत्नांचा व सर्व प्रकारच्या द्रव्याचा त्याग करावा. १५० आत्मा सर्वस्य भाजनम् ॥ ९।४।४२
जीवं हाच सर्व गोष्टींचा आधार आहे. [ आधीं जीव जगेल तर सर्व काही अनुकूल होईल.] १५१ आत्मैव ह्यात्मनः साक्षी कृतस्यापकृतस्य च ॥१३।६।२७
आपला आत्माच आपल्या वऱ्या वाईट कृत्यांचा साक्षी आहे. १५२ आत्मैवादौ नियन्तव्यो
दुष्कृतं संनियच्छता ॥ १२॥२६७।२९ पापाचे नियमन करू इच्छिणाऱ्याने प्रथम आपल्या मनाचे नियमन केले पाहिजे. १५३ आत्मोत्कर्ष न मार्गेत परेषां परिनिन्दया ।
__ स्वगुणैरेव मार्गेत विप्रकर्ष पृथग्जनात् ॥ १२॥२८७।२५
दुसऱ्याची निंदा करून आपला उत्कर्ष साधण्याची इच्छा धरूं नये. आपल्या आंगच्या गुणांच्या जोरावरच सामान्य लोकांपेक्षा वरचढ होण्याची इच्छा करावी. १५४ आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।
सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः॥६॥३०॥३२ ( श्रीकृष्ण म्हणतात ) अर्जुना, आपणांला जसें सुखदुःख होते तसेच सर्व प्राण्यांना होते, अशा बुद्धीने जो सर्वत्र सारखेच पहातो तो योगी परमश्रेष्ठ होय. १५५ आददानस्य चेद्राज्यं ये केचित्परिपन्थिनः ।
हन्तव्यास्त इति प्राज्ञाः क्षत्रधर्मविदो विदुः ॥१२।१०७ राज्य घेण्याच्या कामी जर कोणी अडथळा करतील तर त्यांचा वध करावा असें क्षत्रधर्म जाणणारे शहाणे लोक सांगतात.
For Private And Personal Use Only