________________
(४१६ )
जसे पं. रत्नचंद्रजी महाराजांनी २५ मिथ्यात्व १२ अव्रत, पाच प्रमाद, पंचवीस कषाय आणि १५ योग अशा प्रकारे एकूण ८२ भेद घेतले आहेत. आचार्य उमास्वातीच्या ४२ भेदात ह्या ८२ भेदांशिवाय २५ क्रियेला घेतले आहे, तत्त्वार्थ भाष्यामध्ये आणि तत्त्वार्थवार्तिक मध्ये पाच इंद्रियांना नवद्वार म्हटले आहे. आचार्य बनकर यांनी राग, द्वेष, मोह, चार संज्ञा, गौरव हे भेद पण ८२ भेदाने वेगळेच आहे. जर ह्या सर्वांना मिळवले तर १२२ भेद होतात.
ह्या सर्व द्वाराने आयचा आगमन आत्म्यामधे होतो ज्याच्या भारामुळे आत्मा जड बनून संसार सागरात बुडू लागतो. ह्याच्याने वाचण्यासाठी ह्या आस्रव द्वाराला समजून ह्याला रोकण्याचा जो पुरुषार्थ करतो तो संसार सागराने पार होऊ शकतो. प्रत्येक मुमुक्षू जीवात्म्याचा हाच लक्ष्य असायला पाहिजे की आसव द्वार बंद करावे, आणि म्हणूनच आस्रव भावनेचे विवेचन करताना अनेक आचार्य, कवी, लेखकांनी ह्या भेद प्रभेदाचे वेगवेगळ्या दृष्टीने विवेचन केले आहे. ज्याचा विस्तार पुढे केला जाईल.
आचार्य कुन्दकुन्दांच्या मतानुसार मिथ्यात्व पाच, अविरत पाच कषाय चार, आणि योग तीन असे आस्रवचे भेद मानले गेले आहे. ज्याच्यात मिथ्यात्वाच्या नावामध्ये थोडा शब्दभेद आहे, अर्थाच्या दृष्टीने विशेष काही फरक नाही, त्याची नावे आणि अर्थखातील प्रमाणे आहे.
१) एकान्त "हे असेच आहे" अशा आग्रह बुद्धीने धर्माविषयी एकान्त अभिप्राय ठेवणे मिथ्यात्व आहे.
२) विपरीत सपरिग्रह पण निर्ग्रन्थ असू शकतात, इत्यादी विपरीत अभिप्राय ठेवणे विपरीत मिथ्यात्व आहे.
३) संशय " सम्यग्दर्शन, ज्ञान, चारित्र मोक्ष मार्ग होऊ शकतो की नाही " अशी डोलायमान चित्तवृत्ती होणे संशयिक मिथ्यात्व आहे.
४) विनय सर्व देवात, सर्व शाखात आणि गुरुजनामध्ये विनयरहित समभाव ठेवणे वैयनिक मिथ्यात्व आहे.
५) अज्ञान हित आणि अहिताच्या परीक्षेत असमर्थ होणे अज्ञान मिध्यात्व आहे. हे सर्व आसयचे कारण आहे.
अविरत
अहिंसा इत्यादी पाच व्रतांचे पालन न करणे अविरत आहे.
-