________________
ज्याप्रमाणे विहिरीत पाणी येण्याचा मार्ग त्याचे अनन्त नोत आहे, नावेत पाणी भरण्याचे कारण त्याचे छिद्र आहेत, घरात प्रवेश करण्याचे साधन त्याचे दार आहे. त्याचप्रमाणे जीवप्रदेशात कर्माच्या आगमनाच्या मार्ग आस्रव आहे. कर्माच्या प्रवेशाचा हेतू साधन, निमित्त आस्रव आहे म्हणून ह्याला आरनवद्वार पण म्हणतात. २२९
आग्नव आणि कर्म वेगवेगळे आहे - ज्याप्रमाणे दरवाजा आणि त्यात प्रवेश करणारे प्राणी एक नसतात, घराचे दार हे प्रवेशद्वार आहे त्याचप्रमाणे आनव आणि कर्म वेगळे आहे. आणि जो कर्म पुद्गलाला ग्रहण करण्याचा हेतू आहे तो आनव आहे आणि ज्याला ग्रहण केले जाते ते ज्ञानावरणीय इत्यादी आठ कर्म आहे.२३०
आग्नवचे वेगवेगळ्या ठिकाणी बेगवेगळे भेद दिसून येतात. जे संक्षिप्त रूचि आणि विस्ताररुची असणाऱ्यांच्या दृष्टीने आहे. ह्यात जघन्य (कमीत कमी) आग्नवाचे दोन भेद आहे- द्रव्यानव, भावानव नंतर पाच आणि नंतर वीस भेद प्राप्त होतात. ज्याच्यात आधी पाहिले ते मिथ्यात्व इत्यादी पाच भेद, तसेच प्राणातिपात पासून परिग्रहपर्यंतचे पाच आरनव, पाच इन्द्रियाचे पाच आग्नव, मन, वचन, कायेच्या योगाचे तीन, आणि भण्डोपकरण आग्नव व शुची कुशाग्राचा आस्रव अशा प्रकारे वीस होतात.२३१
उमास्वातीने तत्त्वार्थ सूत्राच्या सहाव्या अध्यायाच्या सहाव्या सूत्रात आग्नवच्या ४२ भेदाचा उल्लेख केला आहे. ज्याच्यात पाच इन्द्रिय, चार कषाय, पाच अवत, तीन योग आणि पंचवीस क्रिया घेतल्या आहेत.
जैनाचार्य अमोलकऋषिजी महाराजांनी पंचवीस कषाय पंधरा योग बारा अव्रत, पाच मिथ्यात्व असे कर्मबंधाचे सत्तावन हेतू सांगितले आहे.२३२
शतावधानी पंडितमुनी श्री रत्नचन्द्रजी महाराजांनी आस्रवचे ८२ भेद सांगितले आहे. ह्याच्यात भेदांची अल्पाधिकता असताना पण प्रतिपादित विषयात विशेष फरक नाही. तसे तर आप्रवचे असंख्य भेद पण होऊ शकतात. जितके पण कर्म येण्याचे मार्ग आहेत सगळे आनवच्या भेदात समाविष्ट होऊ शकतात. पण सुव्यवस्थितरूपाने प्रतिपादन करण्यासाठी आचार्यांनी, ग्रंथकारांनी आपल्या आपल्या दृष्टीने भेदांची संख्या निर्धारित केली आहे.
ह्या सर्व भेदानमध्ये सर्वाधिक भेद पं. रत्नचंद्रजी महाराजद्वारा प्ररूपित ८२ भेद आहेत. अन्य स्थानावर जे भेद आहेत त्यात ८२ भेदातले जे भेद नाहीत ते मिळवले गेले तर भेदांची संख्या आजून जास्त होते.