________________
(४१३)
आहे आणि कर्म स्कंधाच्या आगमनानंतर दुसऱ्या क्षणात त्या कर्मस्कन्धाचे जीव प्रदेशामध्ये स्थित होणे बंध आहे. हा आस्रव आणि बंधमध्ये फरक आहे. २१९
आस्रव शब्दाची व्युत्पत्ती करताना पूज्य आचार्य घालीलालजी महाराज लिहितात आ समन्तात् स्रवति प्रविश्यत्यार्थादात्मनि ज्ञानावरणीयाद्धष्टविधं कर्म येन सः आस्रवः २२० अर्थात ज्याच्या द्वाराज्ञानावरण इत्यादी आठ प्रकारचे कर्म आत्म्यामध्ये सगळीकडून येतात त्याला आग्रव म्हणतात. अर्थात ज्याच्या द्वारा कर्माचे उपार्जन होते
त्याला आनव म्हणतात.
-
आस्रवचे सामान्यतः दोन भेद आहे १) साम्परायिक आग्रव २) इयपथ आसव कपाय सहित जीवाला साम्परायिक आस्रव होतो आणि कपाचरहित वीरागी जीवाला इर्यापथ आस्रव होतो. २२१
-
जो संसार वाढवतो तो सांपरायिक आस्रव आहे - सांपरायः संसारः सम्पराय संसाराचा पर्यायवाची आहे, तत्प्रयोजन कर्म साम्परायिकम् जो कर्म संसाराचा प्रयोजक आहे तो साम्परायिक आहे. २२२
दर्यापथ आनवामध्ये कर्माचा आनय अर्थात आगमन होतो आणि येऊन काहीच फळ न देता कर्माचा क्षय होतो. इर्याची व्युत्पत्ती "ईरणं" होते, ह्याचा अर्थ गती असा होतो. हे कर्म कषायाच्या अभावाने मात्र इर्या अर्थात गमनागमन इत्यादी क्रियेच्या द्वारा बद्ध होतो. परंतु कषाय नसल्याने उपार्जित कर्मात स्थिती अथवा रसचा बंध होत नाही. मोहाचा सर्वथा उपशम अथवा क्षय झाला तरच अशी स्थिती होते. जोपर्यंत कषायाचा किंचित पण सदभाव आहे तो पर्यंत ईर्यापथ आस्रव होऊ शकत नाही. मिध्यादृष्टी पासून सूक्ष्म साम्पराय अर्थात दहाव्या गुणस्थानापर्यंत कषायाचा उदय असल्याने योगद्वारा आलेले कर्म ओल्या चमड्यावर धुळीप्रमाणे चिटकून जाते. त्यात स्थिती बंध होतो ते साम्परायिक कर्माग्रव आहे.
इयपथ आनव, उपशांत कषाय, क्षीण कषाय आणि सयोग केवळीच्या योगाने आलेले कर्म, कपायाच्या अभावाने सुक्या भिंतीवर पडलेल्या दगडाप्रमाणे दुसऱ्या क्षणातच झडून जातात बद्ध होत नाही. ह्याला इर्यापथ आस्रव म्हणतात. २२३
आचार्य | कुन्दकुन्द समयसारच्या १६८व्या गाथेमध्ये उदाहरणाद्वारा समजवतात की जसे पिकलेले फळ झाडावरून आपोआप खाली पडते आणि पुन्हा कधीच ते झाडाला चिटकत नाही, तसेच कषायमुक्त झाल्यानंतर जीव कर्म मुक्त होतो. त्याचे कर्म कधी उयात येत नाही.