________________
मानि
सहाही जण मल्लीकुमारीचे मित्र होते. एकाबरोबर दिक्षा घेऊन साधना केली होती. ती स्मृती जागृत झाली आणि जितशत्रू इत्यादी सहाही राजे प्रबुद्ध झाले. २१७
ह्या मनुष्य शरीरात एकाबोटाइतक्या जागेत ९६ रोग आहेत. तर त्या प्रमाणात संपूर्ण शरीरात किती रोग असतील ? त्याचा विचार करा. आणि विचार करुन शरीराबद्दल जो मोह, ममत्व आहे त्याचा त्याग करून जन्म, जरा, रोग इत्यादीपासून मुक्त असणाऱ्या, शुद्ध, सहजात्मस्वरूपी चैतन्यरूपी, आनंदधाम असणाऱ्या अशा आपल्या आत्म्याची निरंतर भावना करा.२१८
'शरीरं व्याधि मंदिरम्' अर्थात शरीर व्याधींचे मंदिर आहे, घर आहे. वर्तमानात सुंदर आणि स्वस्थ दिसते परंतु दुसऱ्याच क्षणी किती व्याधी जडतील याची आपण कल्पना करू शकत नाही.
ह्या अशुचिमय शरीराचे चिंतन केल्याने शरीराचे ममत्व कमी होईल. दैहिक सुंदरतेचे आकर्षण कमी होईल आणि मानवामध्ये आपल्या आत्मिक सौंदर्याचे दर्शन करण्याची भावना जागृत होईल. शरीराचे सम्यग्दर्शन केल्याने जो आत्म्याचा शरीराबरोबर एकात्मभाव झाला आहे तो दूर होईल. शरीराची ममता सुटल्याशिवाय साधनेत प्रगती होऊ शकणार नाही. अशुची भावना त्या शरीराच्या बंधनाला तोडते. शारीरिक बंधन तोडून आपल्या स्वरूपात रमण करायचे आहे. मात्र शरीराच्या अशुचीचे दर्शन करून, शरीराप्रती घृणा ठेऊन, प्रयोजन सिद्ध होत नाही. पण हे शरीर परमात्म्याचे मंदिर आहे, त्यात परमशुद्ध सनातनशिव आत्म्याचे पण दर्शन करायला पाहिजे. हाच अशुची भावनेचा आशय आहे.
आस्रव भावना बारा भावनांच्या चिंतनाचा मूळ प्रयोजन आणि विकाराने भिन्न अशा स्वआत्म स्वरूपामध्ये रमणतेची तीव्र रुची उत्पन्न करणे आहे, त्याच्यात विशेष पुरुषार्थ जागृत करणे आहे. ह्याच प्रयोजनाच्या सिद्धीसाठी आनव भावनेमध्ये विभावाच्या विपरिततेचे चिंतन मुख्य आहे.
परच्या लक्ष्याने उत्पन्न होणारे मोह, राग, द्वेषरूपी आरनवभाव विभाव आहे, आत्म स्वभावाने विपरीत आहे. ह्याला समजण्यासाठी आग्नवभावनेच्या पूर्वी सहा, भावनेमध्ये आत्मा आणि अन्य संयोगी पदार्थाची नश्वरता, अशरणता, संसारात अनेक जन्म मरण केले तरी पण कोणत्याही देहाच्या संयोगात सुखाची अप्राप्यता, जन्म-मरण रोग इत्यादी दुःखांना एकटेच भोगण्याची विवशता, आत्म्याने पृथक पदार्थांची भिन्नता आणि स्व-पर