________________
जर कधी वासनामय विचाराने मन विकृत झाले तर अशा अवस्थेत प्रथम अशुची भावनेने मनाला भावयुक्त केले पाहिजे. ह्या चिंतनाने संसाररूपी कारागाराच्या बंधनातून मुक्ती मिळेल. ह्यासाठीच वर्तमान तीर्थंकर मल्लीनाथ स्वामी यांच्या कुमार अवस्थेतील शरीरांच्या सौंदर्याची वास्तविक स्थिती दाखविणारे एक मार्मिक उदाहरण आहे.
भगवान मल्लीनाथ यांना पूर्वजन्मात केलेल्या कपटामुळे स्त्रीगतीचा बंध पडला आणि कुंभराजाच्या घरी पुत्रीरूपात जन्म घेतला. त्या त्याच भवात तीर्थंकर होणार होत्या. खीचे शरीर स्वभावतः कोमल आणि सुंदर असते, त्यात तीर्थंकर देव तर अनंतपुण्याचे पुंज असल्याने त्यांची सुंदरता तर अद्वितीय असते. मल्लीकुमारीची सुकुमारता भरतक्षेत्राच्या चहूदिशेत आकर्षणाचे केंद्र बनली. अनेक राजा आणि राजकुमार मल्लीकुमारीबरोबर लग्न करण्यासाठी उत्सुक झाले. त्यात सहा देशांच्या राजांनी मल्लीकुमारीबरोबर लग्नाचा प्रस्ताव घेऊन दूत पाठविले. ते एकाच वेळी, एकाच दिवशी मिथिला नगरीच्या कुंभराजाच्या राजसभेत येऊन पोहचले. एक कन्या आणि सहा पती ? कसे संभव होईल ? सर्वांना हे माहीत होते की मल्लीकुमारी वैराग्य घेणारी, संसारातून विरक्त असणारी ह्याच भवात तीर्थंकर होणार आहे. कुंभराजाने सहा दूतांनाही रिकाम्या हातीच पाठविले. त्यामुळे ते सहाही राजे, हा आपला अपमान आहे असे समजन क्रद्ध झाले आणि कंभराजाच्या राज्यावर त्यांनी आक्रमण केले. एकाचवेळी त्या सर्व राजांनी वेगवेगळ्या दिशेने आक्रमण करुन मिथिलेला घेरून टाकले. कुंभराजा क्षत्रियत्वाच्या नात्याने सेना घेऊन युद्ध करण्यासाठी तयार झाले. मल्लीकुमारी म्हणाली, "पिताश्री ! माझ्यासाठी नरसंहार होणे मला योग्य वाटत नाही. मी दुसऱ्या उपायाने ह्या राजांना समजावून सांगेन. तुम्ही युद्धात क्षत्रियांच्या रक्ताची आहुती देऊ नका.
___ मल्लीकुमारीला जन्मापासून अवधिज्ञान होते. हे सर्वकाही घडणार आहे ह्याचे त्यांना ज्ञान होते. म्हणून त्यांनी आधीपासूनच अशी एक योजना के ली की अशोकवाटिकेमध्ये एक अत्यंत रमणीय भवन बनविले. त्याला 'मोहनगृह' असे म्हणत होते. त्याच्या मध्यभागी सहा रत्नजडीत गर्भगृह होते आणि त्याच्या मधोमध चारीबाजूंना जाळी असलेले जाळीगृह होते. त्यामुळे आतील व्यक्ती बाहेरचे पाहु शकत होती. त्या जाळीगृहाच्या मध्यभागी एक मणिमय पिठिका तयार केली होती. त्या पिठिकेवर स्वतःच्या चामड्याप्रमाणे चामडे असणारी, स्वतःच्या वयाची दिसणारी, स्वतःसारखे रूप लावण्य, यौवन आणि गुणांनी युक्त एक सुवर्णाची प्रतिमा तयार केली होती. त्या प्रतिमेच्या