________________
(४०७)
येत नाही. पूज्य तिलोकऋषी महाराज लिहितात
सागर जल करी जो नित धोवे तो पण शुचि नहीं थावे ॥ हाड करंडिया भंड महीकी, इणे पर क्यों तु भरमावे रे प्राणी ||६|| सहस्र दिनार को एक कवो लेवो, जीमे एम सदाही ।
तो पण दे दगो एक पल में काढे जीव ने साही रे... प्राणी ||७|| २१४ समुद्राएवढ्या पाण्याने रोज ह्या शरीराला धुतले तरीही ते शुचित्वाला प्राप्त होत नाही. हा हाडांचा पिंजरा आहे. ह्या मातीने लिप्त झालेल्या पात्रामध्ये जीव का भ्रमित होतो ?
ह्या शरीराची शेतीसुद्धा वेगळ्या प्रकारची आहे. ह्यात पेरतो एक आणि उगवते दुसरेच. जसे ह्याचे रोज पंचामृतरसाने पोषण केले जाते आणि त्याचे रक्त आणि मांसात रूपांतर होते. अन्य शेतात तर जसे बी पेरावे तशी फळे प्राप्त होतात. परंतु ह्या शरीराची गोष्टच वेगळी आहे. हे शरीर अन्नापासून विष्ठा बनविण्याचा कारखानाच आहे.
Eagles gard
Pradyo
Committ
परंतु ज्याप्रमाणे ज्ञानी खाऱ्या समुद्रातून रत्ने प्राप्त करतात, तसेच मिळालेल्या देहाचा मोक्षफलदायी धर्माराधना करण्यासाठी उपयोग करणे हीच खरी बुद्धिमत्ता आहे. ह्या देहाच्या दोन पक्षांचे वर्णन करताना श्री गणेशमुनी शास्त्री लिहितात - जर हा देह 14नसता तर संसाराची खटपट नसती, कुटुंब नसते, कोणी व्यापार करू शकले नसते, भंडार भरले नसते, हे शरीर नसते तर कोणी खोटे बोलले नसते, कोणाला लुटले गेले नसते, संग्राम झाला नसता, कामक्रोधाने आपल्याला सतावले नसते, प्रतिशोध घेण्याची भावना झाली नसती, मायाजाळ पसरले गेले नसते, कोणी वाकडी चाल चालले नसते, कोणी कोणाचा अपमान करू शकले नसते, कोणाला अभिमान झाला नसता, शरीर नसते तर काहीच पाप नसते आणि तुम्ही व आम्हीसुद्धा राहिलो नसतो. ह्या शरीरामुळेच ही सर्व ओढाताण आहे. परंतु हे देहाचे एक निषेधात्मक स्वरूप झाले. प्रत्येक नाणाच्या दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक वस्तूमध्ये दोन गुण असतात. देहमात्र हेय अर्थात उपेक्षेचे पात्रच नाही परंतु उपादेय सुद्धा आहे. ह्या संसारात जर हा मनुष्यदेह नसता तर जगात धर्म-सत्कर्म कसे केले असते ? उपवास आणि शास्त्राभ्यास नसता, ज्ञान व ज्ञानी यांचा सन्मान नसता, परोपकार आणि सत्याचा प्रचार झाला नसता, दान आणि कल्याणाची कार्येसुद्धा झाली नसती, व्याख्यान झाले नसते, गुणवान दिसले नसते. अरिहंत नसते, आचार्य महन्त नसते, गुरू, ईश्वर नसते, साधुसंत नसते, संघ आणि समाज नसता, तर
Registrar
Jo Acid