________________
(४०५)
तेव्हाच होईल जेव्हा प्राणी स्व किंवा पर शरीरामध्ये अनुरक्त न होता आत्मभावनेत लीन होईल.२०७
आचार्य हेमचंद्रांनी लिहिले आहे की अशुचीने परिपूर्ण अशा या देहात शौच्य अर्थात पवित्रतेची संकल्पना करणे महामोहमय प्रवंचनाशिवाय दुसरे काय आहे ?२०८
मोहामुळेच मानव अशा अशुचिमय शरीरात आसक्त होतो. जीवनाचा अमूल्य वेळ केवळ ह्या शरीराला सजविण्यात, पालनपोषण करण्यात आणि पुष्ट करण्यातच व्यर्थ नष्ट करतो.
श्री सोमदेवसूरी म्हणतात - हे जीवा ! जर एखाद्याच्या शरीराचा आंतरीक भाग संयोगवश शरीराबाहेर आला तर त्यावेळी त्या शरीराला पाहून हाच विचार येतो की, हा दूर राहिला तर चांगले होईल. त्यावेळी त्याच्या अशुचितेमुळे त्याला पाहण्याची इच्छा करीत नाही. शरीराची ही वास्तविकता आहे म्हणून ज्ञानीजन ह्या शरीराच्या माध्यमाने अनंत सुखरूपी धान्य उत्पन्न करायला सांगतात.२०९ परंतु इतके प्रत्यक्ष पाहत असतानाही मनुष्य जागृत होत नाही. तो अशुचिमय शरीराला सर्व तीर्थांच्या सुगंधी पाण्याने धुवून असे मानतो की, आता हे शुद्ध झाले आहे. असे कधीच होऊ शकत नाही. ह्या गोष्टीला समजण्यासाठी उपाध्याय विनयविजय यांनी खूपच थोडक्या शब्दात एक उदा. देताना लिहिले आहे
एका दारूच्या घड्याला एक छिद्र आहे आणि त्यातून गळणाऱ्या मदिरेच्या थेंबाने त्याचा बाह्यभाग अपवित्र झाला आहे. त्याच्या बाह्यभागाला मातीने चांगल्याप्रकारे मर्दन केले आणि गंगेच्या पाण्याने अनेकवेळा धुतले तरी तो घडा जसा पवित्र होत नाही. त्याचप्रमाणे घाणेरडी हाडे, मांस, मलमूत्र, चमडी आणि रक्ताने भरलेले हे मनुष्याचे शरीरसुद्धा पवित्र होऊ शकत नाही.
मनुष्य पुन्हा पुन्हा स्नान करून शरीराला शुद्ध मानतो, चंदनाचा लेप करून स्वतःला स्वच्छ मानतो. परंतु हा त्यांचा भ्रम आहे. उकिरड्याला शुद्ध करू शकत नाही.२१०
जर शुद्ध झाला तर त्याला उकीरडा कसे म्हणू शकणार ? त्याचप्रमाणे शरीराला कितीही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला तरी तो कधीही शुद्ध होणार नाही. चंदन इत्यादींच्या लेपाविषयी ह्या गाथेत सांगितले आहे. परंतु आज अनेक प्रकारचे सेंट/अत्तर लोक आपल्या कपड्यावर टाकातत, त्याने ते आपल्या शरीराच्या दुर्गंधतेला दाबण्याचा प्रयत्न करतात.
Vasailitnewsniysise
।
Postale nted