________________
उपाय न करता आत्मशांती, आत्मशुद्धी आणि आत्मशुचिता यावर लक्ष केंद्रित करून आत्मसिद्धी प्राप्त केली. त्यांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे. वैराग्याचा उत्तमबोध देणारे आहे. श्रीमद् राजचंद्रजी यांनी अशुची भावनेमध्ये चतुर्थ चक्रवर्तीचा उल्लेख केला आहे.२०५ यात सनत्कुमार चक्रवर्तीच्या जीवनाचे विवेचन केलेले आहे.
स्वामीकुमार विरचित कार्तिकयानुप्रेक्षेमध्ये अशुची भावनेचे वर्णन करताना लिहिले आहे की संसारात सुंदरता आणि कुरूपता, आकर्षण आणि अनाकर्षणाचे केंद्र असणारे जे शरीर आहे त्याचा मोह जीवाला अघोगतीच्या मार्गावर नेतो.
आचार्य शुभचंद्रांनी कार्तिकेयानुप्रेक्षेच्या टिकेमध्ये अशुची भावनेचे अत्यंत विस्तृत विवेचन केले आहे. त्यात शरीराच्या आंतरिक विभत्सतेचे दिग्दर्शन केले आहे. त्यात लिहिले आहे की शरीराचे अवयव अशा प्रकारे आहेत. ह्या शरीरात तीनशे हाडे आहेत. ते सर्व मज्जाधातूंनी भरलेले आहेत. सांधेसुद्धा तीनशे आहेत, नऊशे स्नायू आहेत, सातशे शीरा आहेत. पाचशे मांसपेशी आहेत, शीरेचे चार समूह आहेत, रक्ताने भरलेल्या सोळा महाशीरा आहेत, शीरेचे सहा मूळ आहेत, पाठ आणि पोटाजवळ दोन मांसरज्जू आहेत, चमडीचे सात पट म्हणजे पटल आहेत. सात कालेयक अर्थात मांसखंड आहेत, लाखो-करोडो रोम आहेत, आमाशयामध्ये सोळा आतडी आहेत, सात दुर्गंधाची आश्रये आहेत, तीन स्थूणा आहेत, अर्थात वात, पित्त, आणि कफाच्या स्थूणा, एकशे सात मर्मस्थाने आहेत, नऊ मळद्वारे आहेत, यातून नेहमी मळ वाहत राहते. एक ओंजळीप्रमाण मस्तिष्क आहे, एक ओंजळी प्रमाण मेद आहे, एक ओंजळी प्रमाण ओज आहे. एक ओंजळी प्रमाण वीर्य आहे, तीन ओंजळी प्रमाण वसा आहे, तीन ओंजळी प्रमाण पित्त आहे. आठ शेर रुधिर आहे, सोळा शेर मूत्र आहे, चोवीस शेर विष्ठा आहे, वीस नखं आहेत. बत्तीस दात आहेत. हे शरीर कमी जीवाने भरलेले आहे. रस. रुधिर. मांस मेद हाडे, मज्जा आणि वीर्य ह्या सात धातूंपासून बनलेला आहे म्हणून शरीर अत्यंत अशुचितेचे घर आहे.२०६
___ ह्यात सुंदरतेच्या आवरणाखाली झाकलेली कुरूपता, मलीनता, दूषितता, घृणास्पदता इत्यादींचे विवेचन केले आहे. बाह्यरूपाने इंद्रियांना जे आकर्षक वाटते ते आंतरीक रूपाने किती भयानक, कलुषित आहे हे समजण्यासाठी जीवाला जागृत केले आहे. त्यामुळे तो भौतिक, दैहिक अवस्थे बरोबर जुळलेल्या ममतेने विमुक्त होईल. त्याची दृष्टी देहापासून दूर होऊन आत्म्यावर लागेल. "अशुची भावनेच्या चिंतनाची सार्थकता
1200