________________
(४०२)
केली. अशुचीने उत्पन्न झालेले. त्यांचे इतके सुंदर सौंदर्य असू शकते का ? अशी शंका दोन देवांच्या मनात उत्पन्न झाली त्यामुळे शंकेचे निवारण करण्यासाठी त्या दोन्ही देवांनी ब्राह्मणाचे रूप घेतले आणि प्रातःकाळी राजदरबारात पोहचले. त्यावेळी राजाच्या स्नानाची वेळ होती म्हणून राजाच्या शरीराला उटणे इत्यादींचे मर्दन केले होते. दोन्ही ब्राह्मण सनत्कुमारांजवळ गेले आणि म्हणाले, 'आम्ही तुमच्या सौंदर्याची खूप प्रशंसा ऐकली होती म्हणून दर्शन करण्यासाठी आलो आहोत. खरोखरच तुम्ही त्या प्रशंसेच्या योग्यच आहात. स्वाभिमानाने सनत्कुमार म्हणाले तेव्हा तर तुम्ही चूक केली. जर तुम्हाला माझे रूपच पाहायचे होते तर जेव्हा मी स्नानादी उरकून आपल्या राजकीय पोषाखात सिंहासनावर बसतो आणि वर छत्र, बाजूला चावय इत्यादी असतात तेव्हा पाहायला पाहिजे होते.
दोन्ही ब्राह्मणांनी सांगितले की जर आपली कृपा असेल तर ती संधी आताही आम्हाला मिळू शकेल.
सनत्कुमार चक्रवर्तीनी मधुर हास्यासह सांगितले, "होय, तुम्ही थांबा आणि मी आताच तास-दोन तासात राजसभेत येतो.
सनत्कुमार चक्रवर्ती त्यानंतर स्नानादी उरकून त्वरितच बहुमूल्य वस्त्राभूषण धारण करून राजसभेत आले. गर्वाने दोन्ही ब्राह्मणांना म्हणाले, "काय, आता पाहिले माझे सौंदर्य ? पहिल्या आणि आताच्या सौंदर्यात वास्तविक किती अंतर आहे ?
दोन्ही ब्राह्मण नकारार्थी मान हलवून म्हणाले, “सम्राट ! ते सौंदर्य आता राहीले नाही. सर्व स्थितीच बदलली आहे.
चक्रवर्तीनी साश्चर्य आणि खेदाने विचारले, 'ते कसे बरे ?' ब्राह्मणांनी सांगितले, महाराज ! त्यावेळी आपण पूर्ण निरोगी होता. परंतु आता तुमच्या शरीरात एक नव्हे, दोन नव्हे तर सोळा-सोळा रोगांचे अंकुर फुटलेले आहेत. ते थोड्याच वेळात आपला प्रभाव दाखवतील. जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही तुमच्या पानाच्या पिचकारीमध्ये पहा, म त्यात किती किटाणू उत्पन्न झालेले आहेत.
allowa
चक्रवर्तीनी तसेच केले. सर्व वस्तूस्थिती ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे समोर आली. सम्राटचे हृदयपरिर्वतन झाले. ते आपल्या सौंदर्यांची विकृती पाहून विचार करू लागले. क्षणात सोन्यासारखी अमृतमय काया विषमय झाली ? शरीराचे असे अशुचिमय स्वरूप समजून चक्रवर्ती विरक्त झाले. सहा खंडांचे राज्य सोडून अयोध्यानगरीतून निघून गेले.