Book Title: Jain Darshan Bhavna Part 02 Author(s): Punyasheelashreeji Publisher: Sanskrit Pragat Adhyayan Kendra View full book textPage 9
________________ (४००) जास्त धन असते. त्याला त्याच्या रक्षणाचे भय असते. इष्ट वियोगाने उत्पन्न झालेला संताप शोक आहे. जेव्हा चोर धन चोरतात तेव्हा त्याच्या वियोगाने सुद्धा मनुष्य शोक करतो. वचन - प्रतिवचनरूप द्वंद्व कलह हे आहे. अर्थात परस्पर भांडणे कलह आहे. धनासाठी भावाभावांमध्ये, पिता-पुत्रांमध्येही कलह होतो. रतिकर्मामुळे उत्पन्न होणारी प्रीती राग आहे. अरतिकर्माने उत्पन्न होणारी अप्रीती द्वेष आहे. मिथ्यात्व असंयम इत्यादीचा परिणाम मोह आहे. ह्या सर्वांना अशुभ म्हणतात. धनामुळेच हे अशुभ परिणाम होतात. धन, स्त्री इत्यादी पदार्थांमुळे जे काही सुख प्राप्त झालेले दिसते ते सुख नाही. परंतु सुखाभास आहे. संसारी भोगमय सुख अशुभ आहे कारण सर्वप्रथम ह्यांना प्राप्त करण्यासाठीच फार संकटे सहन करावे लागतात. अनेक धोक्यातून पार पडावे लागते. जरी भोगसुख मिळाले तरी ते दीर्घकाळापर्यंत टिकत नाही. ते तुच्छ आणि परिणाम विरस आहे. तं सुद्धा अशुभ आहे. २०० इंद्रिय विषयाचे सेवन पापजनक आहे. म्हणून ते सर्व अशुभ आहे. हा अशुभाचा परिणाम आहे. अशुचीने व्याप्त अशा मातृगर्भात जीव राहतो. जरायु पटलाने वेष्टित राहता. मातेच्या कफ, लाळ आणि अशुभ पदार्थांचे सेवन करतो, जे अशुचित्वाने परिपूर्ण आहे. मांस, अस्थी, कफ, वसा, रुधिर, चर्म, पित्त, आतडे, मूत्र इत्यादी अपवित्र अशुची पदार्थांच निवास आहे. अनेक दुःखाचे पात्र आहे. वास्तविक सर्व अशुभ आहे. २०१ हे समजून त्याचे चिंतन केले पाहिजे. इतके वर्णन झाल्यानंतर आचार्य पुढे सांगतात - धन, कामभोग, शरीर इत्यादी सर्वकाही अशुभ आहे. असे चिंतन करता करता मनुष्याने निर्वेदाला - वैराग्य भावनेला आपल्यात जागवून अशी भावना केली पाहिजे की, 'मला अशा अवस्थेला प्राप्त करायचे आहे की ज्यामुळे ह्या अशुचिमय शरीराचा संबंध सुटेल. जन्म मरणाच्या चक्रात यावे लागणार नाही.' ह्या अनुप्रेक्षेचे विवेचन करून शेवटी ते लिहितात की सुर-असुर, नरक-तिर्यंच आणि मनुष्याने संयुक्त अशा ह्या संसारामध्ये वीतराग प्रभूद्वारे प्रतिपादित धर्माशिवाय अन्य काहीच शुभ नाही. २०२ कराचार्यांनी अशुभ अनुप्रेक्षेमध्ये ज्या स्थितीचे वर्णन केले आहे. त्यात अशुचित्वाचा सुद्धा सहजतेने समावेश होऊन जातो. कारण ते अशुभजनितच आहे. म्हणून त्यांनी अशुची अनुप्रेक्षेला अशुभ अनुप्रेक्षेच्या रूपात ग्रहण केले आहे. त्यांनी अत्यंतPage Navigation
1 ... 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 ... 366