________________
(४०६)
परंतु ज्याप्रमाणे फुटबॉलला जितक्या जोरात दाबले जाते, तितक्याच जोरात तो उंच उडतो, त्याचप्रमाणे शरीराला जितके स्वच्छ केले जाते. तितकेच ते पुन्हा पुन्हा घाण होते.
अशुची भावनेच्या चिंतनाने सुज्ञ मनुष्य ज्या बाह्यशुद्धीसाठी जीवनाच्या अमूल्य वेळेला आणि धनाला नष्ट करीत आहे. त्याच्या अनर्थतेचे त्याला ज्ञान होईल आणि आंतरीक शुद्धीमुळे वेळेचे मूल्य, सार्थकता समजून आत्मशुद्धीच्या दिशेने अग्रेसर होईल.
पुढे विनयविजयजींनी गितीकेत ह्या भावनेला स्पष्ट करताना स्वतःला संबोधित करताना म्हटले आहे की, 'हे विनय ! हे शरीर घाण आहे, मलीन आहे, ह्या गोष्टीला तू चांगल्याप्रकारे समजून आपल्या कमळरूपी मनाला विकसित कर आणि जे आत्मतत्त्वरूपी परमात्मा आहे, जो विभू आहे, कल्याणकारी आहे, प्रकाशमय परमविवेकयुक्त आहे त्याचे चिंतन कर.
तोंडाचा चांगला सुगंध येण्यासाठी पानामध्ये सुगंधी पदार्थ टाकून खातात परंतु तोंड स्वतःच दुर्गंधीयुक्त लाळेने भरलेले आहे. त्यात कृत्रिम सुगंध किती वेळ राहणार ? ह्या शरीराची दशा अत्यंत तिरस्करणीय आहे. ते पवित्र होणार नाही. महापवित्र आगमरूपी जलाशयाला प्राप्त करून तू शांतसुधारसाचे पान कर. त्याने मन पवित्र होईल. २११
ह्यात विनयविजयजींनी अत्यंत सुंदर सांगितले आहे की, ह्या अपवित्र शरीरात एक महापवित्र, सर्वज्ञ, सर्वदर्शी, सर्वव्यापी, प्रकाशमान तेजस्वी, विवेकी विभू बसला आहे. त्याचे चिंतन कर. ज्याच्या संसर्गाने पवित्र पदार्थ पण महान अशुचिमय होतात, ते शरीर नेहेमी उपद्रव युक्त असते. अर्थात अशा शरीराला चांगले ठेवण्यासाठी भोगोपभोगाच्या वस्तूंची इच्छा करणे निरर्थक आहे. २१२
श्री जयसोममुनीच्या सांगण्याचा भावार्थ हा आहे की जीव ह्या शरीराची अशुचिता प्रत्यक्ष पाहतो, अनुभवतो तरीसुद्धा मोहवश शरीराच्या अशुचितेचेही त्या मदोन्मत्त मानवाला भान राहत नाही. जसे मदिरेच्या नशेत व्यक्तीला सत्यासत्य, अर्थानर्थ, सार्थकता - निरर्थकता याचे भान राहत नाही. तसेच जीवात्म्याला सुद्धा मोहरूपी मदिरेच्या नशेत शुचित्व - अशुचित्व यांचे भान राहत नाही. मोहाची नशा उतरविण्यासाठी ज्ञानी पुरुष भावनेचे चिंतन करतात आणि शरीराची अशुद्धता आणि आत्म्याची शुद्धता समजून आत्म्यात स्थित होतात. आत्मा कर्मामुळे बद्ध होतो. २१३ परंतु खाणीतील मातीत राहिलेले सुवर्ण जसे प्रक्रियेने शुद्ध केले जाऊ शकते तसेच आत्म्याला सुद्धा शुद्ध, पवित्र करण्यासाठी साधना, आराधना करून शुद्ध करता येते. परंतु शरीराला लाखो प्रयत्नांनी सुद्धा शुद्ध करता