________________
(४१२)
शरीराची अशुचिता इत्यादी विषयाचे विस्तृत विवेचन केले आहे. ह्या सर्व चिंतन प्रक्रियेचे प्रयोजन दृष्टीला देहादी संयोगाने दूर करणे आहे. अनादिकाळापासून ज्या आत्म्याने अज्ञानामुळे देहादी पदार्थात एकत्व आणि ममत्व स्थापित केले आहे, ते सर्व अनित्य आहे, अशरण आहे. असार आहे. सुख दुःखात सहारा देणारे नाहीत माझ्याने अत्यंत भिन्न आहे, अशुची आहे मी ह्या संयोग भावनेने भिन्न आहे, मी अनन्त गुणाचा धाम, अनन्त अनन्त शक्तीचा संग्रहालय आहे, ज्ञानाचा पुंज आणि आनन्दाचा कन्द आहे.
असे चिंतन केल्याने देहादी संयोगाचा अनुराग कमी होतो आणि एक वेळ अशी येते की जेव्हा आत्मा ह्या चिंतनधारेलापण पार करून आत्मानुभव करू लागतो. तेव्हा मिथ्यात्व ग्रंथीला भेदून सम्यग्दर्शन आणि सम्यग्ज्ञानाने संपन्न होतो. परंतु सम्यगदर्शन आणि सम्यग्ज्ञान, झाले तरी पण अनादिकाळाच्या अभ्यासामुळे संकल्प विकल्पाच्या तरंग पुन्हा उठू लागतात. त्याला चिंतनधारेच्या प्रबळतेने उपशमित केले जाऊ शकते, तरी पुन्हा समाधी भंग होते. हाच क्रम चालू राहातो. आत्म्यामध्ये ज्या राग द्वेष रूपी विकल्प तरंग उत्पन्न होतात हेच भाव आनव आहे, आणि ह्याच भावानवाच्या निमित्ताने कार्मण वर्गणेचे कर्मरूपात परिणमित होणे द्रव्यानव आहे.
आत्म्यामध्ये कर्माला आकृष्ट करण्याची शक्ती आहे. ज्याच्या परिणामस्वरूपी आत्मा आस्रवद्वारा कर्म प्रवाहाला खेचून आत्मप्रदेशा बरोबर एकरूप करून टाकतो असे चिंतन करणे आम्नवभावना आहे. जसे लोहचुंबक आपल्याजवळ असलेल्या लोखंडाला आकर्षित करतो आणि आपल्या बरोबर जोडतो तसेच आत्म्यामध्ये राग द्वेष मोह इत्यादी उठणाऱ्या वृत्त्या द्वारा चौदा राजुलोकामध्ये सर्वत्र असलेल्या कार्मण वर्गणेच्या पुद्गल परमाणुच्या आगमनाचे नाव आस्रव आहे.
भावानव आणि द्रव्य आस्रवाची आणखी एक व्याख्या जैन सिद्धांत कोशामध्ये दिली आहे
जीवाद्वारा मन वचन कायेनेजी काही पण शुभ अथवा अशुभ प्रवृत्ती होते त्याला जीवाचा भावानव म्हणतात. त्याच्या निमित्ताने काही विशेष प्रकारचे जड पुद्गल वर्गणा आकर्षित होऊन त्याच्या प्रदेशात प्रवेश करतात ते द्रव्यानव आहे.
___ आनवामुळे पापकर्माचे आगमन होते. मिथ्यात्व इत्यादी बंधचे हेतू आहे त्याला आस्रव म्हणतात. इथे प्रश्न होणे स्वाभाविक आहे की आस्रव आणि बंधमध्ये काय फरक आहे. त्याचे समाधान हे आहे की प्रथमक्षणात कर्माचा जो आगमन होतो तो आसव