________________
HASEENET
Novemsaniindian
FIRST
A
डोक्यावर छिद्र होते आणि त्यावर कमळाचे झाकण होते. अशाप्रकारची प्रतिमा करून ते विपुल अशन-अन्न, पान-पेय पदार्थ, खाद्य-मेवा मिष्टान्न, स्वाद्य-मुखवास लवंग, विलायची, सुपारी इ. मनोज्ञ पदार्थ जे ती स्वतः रोज खात होती. त्यातला एक-एक घास त्या स्वर्णमय मस्तकात छिद्र असणाऱ्या प्रतिमेत टाकत होती आणि झाकण बंद करून ठेवत होती.
मलीक मारीने वडिलांना समजावन त्या सहाही राजांना आमंत्रित केले. मल्लीकुमारीला भेटण्यासाठी सहाही राजे उत्सुक होते. सर्वजण वेगवेगळ्या रस्त्याने अशोकवाटीकेत आले. ते सर्वजण रत्नजडीत गर्भगृहात वेगवेगळ्या द्वाराने येऊन बसले. सगळ्यांची दृष्टी मध्यभागी स्थित मल्लीकुमारीच्या प्रतिमेवर लागली होती. सर्वांना असे वाटले की मल्लीकुमारी साक्षात उभी आहे. तिचे अनुपम सौंदर्य पाहून सर्वजण मुग्ध झाले होते आणि विचार करीत होते की अशी स्त्री प्राप्त झाली तर आपले जीवन सफल होईल. आणि त्याचवेळी मल्लीकुमारीने आपल्या पुतळ्याच्या डोक्याचे झाकण उघडले. झाकण उघडताच सडलेल्या अन्नाचा दुर्गंध येऊ लागला. सर्व राजांनी नाकावर रूमाल धरला तरी दुर्गधतेमुळे त्यांचे डोके फिरत होते. जीव घाबरू लागला आणि ते व्याकूळ झाले. त्याचवेळी मल्लीकुमारी त्यांच्यासमोर आली आणि म्हणाली, हे राजांनो, तुम्ही ज्या रूपावर मोहीत झाला होता, ज्या सौंदर्याचा अमृताप्रमाणे आस्वाद घेत होता, त्या शरीराच्या दुर्गंधाला का घाबरता ? त्याची घृणा का करता ?
सर्व राजे म्हणाले, ह्या शरीरातून भयंकर दुर्गंध येत आहे. ही दुर्गंध आम्हाला सहन होत नाही.
मल्लीकुमारी म्हणाली - माझ्या ह्या शरीराची सुद्धा हीच स्थिती आहे. ज्या बाह्यसौंदर्यावर तुम्ही वेडे झाले आहात त्याच्या मागे दुर्गंधमय पिंड आहे. प्रत्येक शरीरात मळमूत्राचा असाच दुर्गंध आहे. हा तर प्रत्येक शरीराचा स्वभाव आहे. तुम्ही बाह्यस्वरूपावर मुग्ध झालात परतुं थोडे आंतरिक स्वरूप सुद्धा पहा. ह्या पुतळ्यामध्ये मी एक-एक घास अन्नाचा टाकीत होते त्याने जर इतकी दुर्गंधी पसरली असेल तर मग ह्या शरीरात दररोज बत्तीस घास टाकले जातात त्यात किती दुर्गंधी असेल ?
श्लेप्म, पित्त, मल, मूत्र इत्यादी सणाऱ्या पदार्थांचे भांडार असणारे हे शरीर किती अशुची, दुर्गधिने भरलेले असेल ? तुम्ही अशा दुर्गंधयुक्त शरीरावर आसक्त होऊ नका. मुग्ध बनू नका.
मल्लीकुमारीच्या प्रतिबोधाने सहाही राजांना जातिरम्मरण ज्ञान झाले. पूर्वभवामध्ये
N TRAMERAMA NANDHIANARMINSAINAARINASONIRIRSTARAKSHARMONISTRARIRAMAMAANTARRAININGARORISMAHARISHMAHINARRIMASALAIMISASTERESERMORMATERMINISONSTRIANBARIHARANE