Book Title: Jain Darshan Bhavna Part 02
Author(s): Punyasheelashreeji
Publisher: Sanskrit Pragat Adhyayan Kendra

View full book text
Previous | Next

Page 7
________________ (३९८) सुद्धा घृणास्पद आहे. ह्या कारणाने डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अंगात अशुची आहे. ह्या शरीराला दिवसातून दोन-दोन वेळा स्नान घातले तरी ते शुद्ध राहू शकत नाही. पवित्र आणि निर्मळ राहू शकत नाही. भट्ट अकलंकदेवाने अशुची भावनेचे विवेचन वेगळ्याप्रकारे केले आहे. त्यांनी प्रथम शुचीचे दोन भेद सांगून स्पष्ट केले आहे की ह्याने सुद्धा शरीराची अशुची नष्ट होऊ शकत नाही. त्यांनी लिहिले आहे की, "लौकिक आणि लोकोत्तर यांच्या भेदाने शुचित्व दोन प्रकारचे आहे. कर्मकलंकाला धुवून आत्म्याचे आत्म्यामध्ये अवस्थान लोकोत्तर शुचित्व आहे. ह्याचे साधन सम्यग्दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्यरूपी रत्नत्रय आहे. रत्नत्रयधारी साधू आणि त्याद्वारे अधिष्ठित निर्वाणभूमी इत्यादी मोक्ष प्राप्तीचे उपाय असल्याने शुची आहे. काळ, अग्नी, भस्म, मृत्तिका, शेण, पाणी, ज्ञान आणि निर्विचिकित्सा अशाप्रकारे आठ प्रकारचे लौकिक शुचित्व जगप्रसिद्ध आहे. ह्या दोन्ही प्रकारच्या शुचित्वामधून कोणतेच उपाय ह्या शरीराला पवित्र करू शकत नाही कारण हे अत्यंत अशुचिमय आहे. ह्यांनी आदी आणि उत्तर दोन्ही कारणांच्या अशुचीचे वर्णन करताना लिहिले आहे की शरीराचे आदी कारण वीर्य, रज हे आहे. ते अत्यंत अशुची आहे हे तर पूर्ववतच आहे. परंतु उत्तर कारणाचे विस्तृत वर्णन केलेले आहे. ते लिहितात की, उत्तर कारण आहाराचा परिणाम इत्यादी आहे. कवल आहार-कवल म्हणजे घास घेऊन खाल्लेले भोजन श्लेप्माशयामध्ये पोहचून श्लेष्मासारखा पातळ आणि अशुची होतो. नंतर पित्ताशयात जाऊन आम्ल होतो. नंतर वाताशयामध्ये जाऊन तेथे बायूपासून विभक्त होऊन खल आणि रसरूपात विभक्त होतो. खल-भाग मूत्र, मळ, घाम इत्यादी मळविकाररूपात आणि काही भाग शोणित, मांस, भेद, हाडे, मज्जा आणि शुक्ररूपात परिणत होतो. ह्या सर्व अवस्था अत्यंत अपवित्र आहेत. ह्या सर्वांचे निवासस्थान जे शरीर ते मैलाघर कचरापेटीसारखे आहे. हे शरीर विस्तवाप्रमाणे आपल्या संसर्गात आलेल्या पदार्थाला आपल्यासारखेच करतो. ह्याच्या अशुचीला दूर करण्यासाठी काहीच उपाय नाही. सम्यग्दर्शन इत्यादीने पुन्हा पुन्हा भावित झाले असता ह्या जीवाची आत्यंतिक शुद्धी प्रकट होते. अशाप्रकारे स्मरण, अनुचिंतन केल्याने शरीराबद्दल वैराग्य निर्माण होते. आणि निर्विण्ण होऊन भवसागर पार करण्यासाठी चित्त तयार होते.१९७ ह्यामध्ये लोकोत्तर शुचीचे वर्णन करताना रत्नत्रयधारी साधूजन आणि त्याद्वारे

Loading...

Page Navigation
1 ... 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 ... 366