________________
(४०१ )
खोलात जाऊन अशुचितेचाही संकेत केला आहे.
आचार्य शिवार्य यांनी सुद्धा 'अशुची' याऐवजी अशुभत्वाचा प्रयोग केला आहे. जवळजवळ सर्व श्वेतांबर आचार्य आणि दिगंबर आचार्य कुंदकुंद द्वारा रचित द्वादशानुप्रेक्षेमध्येही अशुची भावनेचा संबंध देह इत्यादींची अशुचिता, अपवित्रता आणि देहगत रुधिर, मांस, मल, मूत्र विषयक मलिनतेबरोबर जोडलेला आहे. भगवती आराधना आणि मूलाचारामध्ये ह्या भावनेचे एका नव्या रूपात वर्णन केले आहे. त्यांनी अर्थ, धन, काम - विषयवासना आणि समस्त मनुष्यदेहाला अशुभ सांगितले आहे. 'दुःखाची खाण ' म्हणून सांगितले आहे. एक धर्मच त्यांच्या मतानुसार शुभ आहे अन्य सर्व सांसारीक पदार्थ अशुभ आहेत. २०३
भगवती आराधना आणि मूलाचार यांच्या लेखकाचे हे मौलिक चिंतन आहे. दोन्ही ठिकाणी वर्णन क्रमामध्ये काही भिन्नता दृष्टीगोचर होते. परंतु तेथे तात्पर्य भेद नाही. भगवती आराधनेमध्ये धनाला इहलोक व परलोकसंबंधी दोषांना आणणारा असे सांगितले आहे व ते मनुष्याला नेहमी निंदेस पात्र बनविते. अर्थ अनर्थाचे मूळ आहे. ते मनुष्याकरिता भयरूप असून मोक्षमार्गासाठी अर्गला - साखळीरूप आहे.
येथे शरीराला कुटी अर्थात लहानशा घराची उपमा दिली आहे. ती हांडेरूपी पर्णानी बनलेली आहे, शीरारूपी वल्कलांनी (सालपटांनी) बांधलेली आहे, मांसरूपी मातीने लिपलेली आहे आणि अनेक अपवित्र वस्तूंनी भरलेली आहे. अशाप्रकारे हे शरीररूपी घर घृणास्पद आहे.
ज्याप्रमाणे कोळशाला पाण्याने धुतले तरीसुद्धा तो सफेद होत नाही त्याचप्रमाणे जल इत्यादीने धुतले तरीही शरीरशुद्धी होत नाही. परंतु ते पाण्याला सुद्धा अपवित्र करून टाकते.
एक धर्मच पवित्र आहे कारण रत्नत्रयात्मक धर्मामध्ये स्थित जीवाला देवता सुद्धा नमस्कार करतात. पवित्र धर्माच्या संबंधाने आत्मा सुद्धा पवित्र आहे. रत्नत्रयरूप धर्माची साधना केल्याने साधुच्या शरीराचा मळ इत्यादी अशुचिसुद्धा औषधी रूप होते. २०४
अवसर्पिणीकाळाचे चौथे चक्रवर्ती सनत्कुमार ज्यांनी अन्य चक्रवर्तीप्रमाणे सहा खंडांवर दिग्विजय प्राप्त करून पूर्ण साम्राज्य प्राप्त केले होते. त्यांचे रूप लावण्य तारुण्यामुळे अधिकच चमकत होते. एकदा देवसभेत इंद्राने त्यांच्या सौंदर्याची खूप प्रशंसा