________________
(४०३)
सोळा रोगांची चिकित्सा न करता संयमाचा अंगिकार केला. आपल्या जीवनाला त्यांनी तप, ध्यान आणि साधनेमध्ये लावले. एकीकडे सोळा रोगांनी घेरले आहे आणि दुसरीकडे संयमाचा कठोर मार्ग आहे. सनत्कुमार मुनींच्या मनात रोगाबद्दल अरती, तिरस्कार नव्हता किंवा शरीराबद्दल रती- आसक्ती नव्हती. त्यांना अशी अनुभूती होत होती की, जणूकाही शरीर नाहीच.
इंद्राने पुन्हा एकदा आपल्या सभेत सनत्कुमार मुनींच्या कष्ट सहिष्णुतेची प्रशंसा केली. इंद्राने सांगितले की भयंकर रोगाने त्रस्त असूनही ते औषधोपचार करीत नाहीत. हा त्यांचा अटल निश्चय आहे. त्यांच्या दृढतेची कसोटी पाहण्यासाठी एक देव वैद्याचा वेष घेऊन सनत्कुमाराजवळ आले आणि सांगू लागले, "मी एक कुशल वैद्य आहे, आपले शरीर रोगग्रस्त दिसत आहे. जर आपण आज्ञा दिली तर मी तुम्हाला रोगमुक्त करीन.' मुनीराज म्हणाले हे वैद्यराजा कर्मरूपी भवरोग नष्ट करण्याची शक्ती जर तुमच्यात असेल तर आनंदाने माझे भवरोग नष्ट करा. जर भवरोगच नष्ट झाले तर शारीरिक, रोग नष्ट करण्याची काय आवश्यकता ? असातावेदनीय कर्माचा क्षय होताच ते रोग आपोआप नष्ट होतील.
-
"
वैद्याचे रूप घेऊन आलेल्या देवाने भवरोग नष्ट करण्याची स्वतःची असमर्थता दाखविली. तेव्हा मुनिराजांनी आपली थुंक बोटावर लावली तितका भाग रोगमुक्त झाला. त्यांच्याजवळ इतकी तपोलब्धी असतानाही रोगाची आणि वेदनेची त्यांनी उपेक्षा केली. त्यांनी देवाला सांगितले की हे रोग शरीराचे आहेत, आत्म्याचे नव्हते.
शरीर अशुचिमय आहे, रोगाचे घर आहे, व्याधीचे स्थान आहे. हे ज्ञानी पुरुष जाणतात म्हणून त्याचा करीत त्याची साजसज्जा नाहीत. आचार्य शिवार्यांनी १८१४ व्या गाथेत लिहिले आहे की रत्नत्रयरूपी धर्माची साधना करणाऱ्या साधूच्या शरीराचा मळसुद्धा औषधिरूपी असतो. सनत्कुमार चक्रवर्तीच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होते की त्यांच्या थुंकीत संपूर्ण रोग नष्ट करण्याची शक्ती होती. परंतु त्यांचे लक्ष्य शरीर नव्हते तर आत्मा होता. आत्मा हे ज्याचे लक्ष्य असते त्याला ह्या अशुचिमय शरीराचा मोह राहत नाही. जर त्यांची इच्छा असती तर ते मोठे मोठे वैद्य हकीम इत्यादींकडून चिकित्सा करवून स्वस्थ झाले असते. आणि राज्यभोग घेत राहीले असते. परंतु शरीरात रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे असे समजताच शरीराची नश्वरता, अशुचिता पाहून त्यांचे मन बदलले आणि ते प्रव्रजित झाले. रोग नष्ट करण्याची लब्धी असताना सुद्धा त्यांनी शरीर स्वास्थ्यासाठी