Book Title: Jain Darshan Bhavna Part 02 Author(s): Punyasheelashreeji Publisher: Sanskrit Pragat Adhyayan Kendra View full book textPage 8
________________ H anuary अधिष्ठित निर्वाणभूमी इत्यादींना शुची म्हणून सांगितले आहे. कारण परंपरेने मोक्षप्राप्तीचे ते साधन आहे. साधूच्या सत्संगतीने भावधारा बदलल्याने आणि जेथून तीर्थंकर, अरिहंत इत्यादींना निर्वाण प्राप्त झाले अशा निर्वाणभूमीत तीर्थंकरांच्या गुणांचे स्मरण करून ते गुण स्वतःमध्ये आणण्याचे भाव येणे अथवा सम्यग्दर्शन इत्यादींच्या भावनेने आत्म्याच्या पवित्रतेत वृद्धी होऊ शकते. ह्याच भावनेमध्ये शरीराची अशुचिता आणि आत्म्याच्या शुद्धतेचे ज्ञान करवून घेऊन शरीराच्या ममत्वाचा व रागाचा त्याग करण्यासाठी आणि आत्म्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी निरंतर चिंतन करायचे आहे. आचार्य वट्टकेर यांनी बारा अनुप्रेक्षेमध्ये अशुची याऐवजी 'अशुभ' असे नाव दिलेले आहे. ह्यात अशुची भावनेप्रमाणे शरीर इत्यादींच्या अपवित्रतेविषयी तर लिहिलेच आहे. परंतु त्याचबरोबर सर्व अशुभ दुःखदायक वस्तूच्या अशुभतेचा सुद्धा विचार केलेला आहे. अशुभ अनुप्रेक्षेचे वर्णन करताना लिहिलेले आहे की नरकामध्ये एकांततः नेहमीसाठी अशुभच आहे. तिर्यंचमध्ये बंधन, रोधन इत्यादी. मनुष्यामध्ये रोग, शोक इत्यादी आणि मनासंबंधी अशुभ आहे.१९८ नारकीय जीवांना परमाधामी देव दंडीत करतात, मारतात तेव्हा ते रडतात, ओरडतात. हे सर्व अशुभगर्भित उपद्रव आहेत. तिर्यंचेमध्ये बंधन, रोधन, ताडन, दमन आणि मनुष्यामध्ये अनेक प्रकारचे संकट रोग, शोक इत्यादी अशुभ दुःखे असतात. स्वर्गामध्ये दुसऱ्या देवांद्वारे प्रेरित होऊन भृत्यकर्मे करावी लागतात, दुसऱ्यांचे वाहन व्हावे लागते. देवतांचे शरीर असल्यामुळे उच्चकोटींच्या देवांच्या आज्ञेने लहान देवांनी हत्ती, घोडे, अशी रूपे घ्यावी लागतात. अन्य देवांची महान बरुद्धी, सिद्धी पाहून लहान देवांचे मन खिन्न होते. अशाप्रकारे देवांना सुद्धा मानसिक दुःख होते. ते अशुभ आहे. हे चार गतींच्या जीवांचे दुःख सांगितले. ग्रंथकाराने धनाला सर्व अनर्थांचे मूळ कारण सांगितले आहे. त्यात श्रम, दुःख, वैर, भय, शोक, कलह, राग, द्वेष, मोह हे सर्व अशुभ धनामुळे होतात.१९९ अर्थार्जन करण्यासाठी मनुष्याला घोर परिश्रम करावे लागतात, दुःख सहन करावी लागतात. मरणात द्वेषााला वैर म्हणतात. ह्या अर्थामुळे परस्पर वैराचा, शत्रुत्वाचा बंध होतो. हा बंध दुसऱ्या जन्मी सुद्धा भोगावा लागतोच. कर्माच्या उदयाने जो त्रास होतो ते भय आहे. ज्याच्याजवळPage Navigation
1 ... 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 ... 366