Book Title: Jain Darshan Bhavna Part 02 Author(s): Punyasheelashreeji Publisher: Sanskrit Pragat Adhyayan Kendra View full book textPage 6
________________ (३९७) सौंदर्याला अनर्थाचे मूळ सांगितले आहे. त्यातल्या त्यातही स्त्रीच्या सौंदर्याकडे आकर्षित न होण्यासाठी हजारो ग्रंथ लिहिले आहेत. ज्याच्या मायाजालामध्ये फसून मनुष्य अनेक अनर्थ, भांडण, युद्ध, परस्पर ईर्षा, शंका इत्यादींना जन्म देतो अशा सौंदर्याची अज्ञानी आणि मोहांध लोकांनी प्रशंसा केली आहे तर ज्ञानी, विरागी लोकांनी अशुची आणि घाणेचा आवास सांगून घोर निंदा केली आहे. ह्या शरीराच्या अपवित्रतेचे वर्णन करताना आचार्य कुंदकुंद यांनी लिहिले आहे 'हे शरीर हाडांनी बनलेले आहे, मांसाने वेष्टित आहे, चामड्याने झाकलेले आहे, कृमिकिटकांनी भरलेले आहे. म्हणून नेहमी मळकट आहे, दुर्गंधयुक्त, घृणास्पद, घाणेरड्या पदार्थांनी भरलेला, अचेतन मूर्तिक आहे आणि सडणारे, गळणारे अशा स्वभावाचे आहे. रस, रुधिर, मांस, मेद, हाडे, मज्जा इत्यादी धातूंनी व्याप्त आहे. मूत्र, श्लेष्म इत्यादी दुर्गंधित अपवित्र पदार्थाचे घर आहे. १९५ ज्या शरीराला मनुष्य सजवतो, सुसंवृत्त ठेवतो, त्याच्या सुंदरतेवर मोहित होतो वास्तविक ते काय आहे ह्याविषयी या भावनेमध्ये निरूपण केलेले आहे. त्वचेच्याखाली किती घृणित पदार्थ भरलेले आहेत याची मानवाला सुद्धा कल्पना नाही आणि म्हणूनच तो शरीराला सर्वस्व मानून त्याच्या परिचर्येमध्ये जीवन व्यर्थ घालवितो. "ह्या शरीरामध्ये पवित्र पदार्थाला सुद्धा अपवित्र करण्याची शक्ती आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी त्याच्या अपवित्रतेचा विचार केला पाहिजे. १९६ आचार्य उमास्वातीने उपरोक्त गाथेमध्ये थोडक्यात शरीराच्या अशुचितेचे रहस्य प्रकट केले आहे. ह्या शरीरावर लोक कापूर, चंदन, अगर, केशर इत्यादी सुगंधित द्रव्ये लावतात. परंतु शरीराच्या संपर्काने ते दुर्गंधित होतात. शरीराच्या पुष्टीसाठी अनेक प्रकारचे पौष्टिक पदार्थ, मिष्टान्न, मेवे, फरसाण इत्यादींचे सेवन केले जाते. परंतु त्याचे रूपांतर विष्टेमध्ये होऊन जाते. जे वस्त्र कपाटामध्ये वर्षानुवर्षे घाण होत नाही त्यांना शरीरावर धारण केल्याने काही तासात अथवा दिवसात त्यातून घामाचा दुर्गंध येऊ लागतो. सर्व पवित्र आणि मूल्यवान वस्तूंचे मूल्य कमी करण्याचे काम हे शरीर करतो. शरीराचे आदी कारण रज आणि वीर्य आहे कारण प्रारंभी त्याच्याच मिलनाने शरीराची रचना सुरू होते. नंतर माता जो आहार ग्रहण करते त्या आहाराच्या रसाने शरीराची निर्मिती होते. म्हणून शरीराचे आरंभिक कारण सुद्धा घृणास्पद आहे. उत्तरकारणPage Navigation
1 ... 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 ... 366