Book Title: Jain Darshan Bhavna Part 02 Author(s): Punyasheelashreeji Publisher: Sanskrit Pragat Adhyayan Kendra View full book textPage 5
________________ नाही. शरीराच्या बरोबर राहायचे आणि शरीराची आसक्ती ठेवायची नाही हे काम फार कठीण आहे. म्हणून विशेषतः अशुची भावनेचे चिंतन करण्यास सांगितलेले आहे. ह्या अशची भावनेने देहसक्ती शरीराचा मोह सोडायचा आहे. 'अशुची' शब्द 'घाण' या अर्थी घेतलेला आहे. शुची म्हणजे विमल, विशुद्ध, स्वच्छ इत्यादी. अशुची शुचीच्या उलट मलीन, अशुद्ध अस्वच्छ इत्यादी अर्थाने घेतला जातो. इथे शरीराच्या अशुचीतेचे वर्णन करण्याचे कारण हे आहे की मनुष्य नेहमी मलीन, घाण, अस्वच्छतेचा तिरस्कार करतो. घाणेरड्या पदार्थांप्रती त्याला प्रेम राहत नाही, राग निर्माण होत नाही. ह्या शरीराबद्दल मनुष्याला सर्वाधिक प्रेम आहे. तो राग किंवा प्रेम नष्ट करण्यासाठी ज्ञानी पुरुषांनी शरीराच्या आंतरीक विभत्सतेला घाणीला, अशुचिला दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याला पाहन मनप्याला शरीराबद्दल घणा निर्माण होते आणि देहासक्ती नष्ट होते. मनुष्याला सौंदर्य अतिप्रिय आहे. मग ते सौंदर्य स्वतःचे असो किंवा दुसऱ्याचे. कविजनांनी सौंदर्याचे काव्य लिहिले आहे. लेखकांनी शरीराचे शृंगारीक वर्णक केले आहे. शिल्पकारांनी दगडांमध्ये काष्ठामध्ये सुंदर सौंदर्याला मूर्तिमंत उतरवले आहे. संसारात सर्व अज्ञानी जीवांना जितका मोह आपल्या शरीराचा होतो तितक्या दुसऱ्या कशाचाही होत नाही. आपल्या शरीराला सांभाळण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रिय वस्तूची सुद्धा उपेक्षा करून टाकतो. अज्ञानी व्यक्तीला ज्या शरीराचा एवढा मोह असतो ज्ञानी त्याचीच असारता प्रकट करून मोही जीवांचा अनुराग कमी करण्यासाठी सांगतात की - 'अंतो अंतो पूति देहातराणि, पासति पुढो बि सवंताइं पडिते पडिलेहाए १९८ ह्या शरीराच्या आत अशुची भरलेली आहे. साधकाने त्याला पाहावे. देहाने हारणाऱ्या अनेक अशुची स्रोताला सुद्धा पाहावे. अशाप्रकारे पंडिताने शरीराच्या अशुचितेचे चांगल्याप्रकारे निरीक्षण केले पाहिजे. जसे डॉक्टर अनाथ, मृतक शरीराला गवतामध्ये गुंडाळून सात दिवस पाण्यात ठेवतात आणि जेव्हा त्याचे चामडे हळूहळू सडते, गळते तेव्हा त्या चामड्याला त्याच्यावरून दूर करतो. दूर करून त्याच्या अस्थि पिंजराला दाखवून सांगतो की, पहा ! हे शरीर जसे आत आहे तसे बाहेर आहे. अति अशुचिमय, दुर्गंधयुक्त बिभत्स पदार्थाचा पिंड आहे म्हणून ह्याचा मोह करणे अज्ञान आहे. ज्ञानी पुरुषांनी शरीराच्या बाह्य सौंदर्याची क्षणिकता, रोग इत्यादी दाखवून शरीर SSCRANSWISHEHARSINHAPRASHARASWERVERTISHIDARS SURASARotiVARADICIUNINS a ।Page Navigation
1 ... 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 ... 366