Book Title: Jain Darshan Bhavna Part 02
Author(s): Punyasheelashreeji
Publisher: Sanskrit Pragat Adhyayan Kendra

View full book text
Previous | Next

Page 4
________________ "अन्यत्वभावना से निकले ममता का काटा काला, आर्त शैर्द्र कुध्यान मिटे झट पी समता रस प्याला ।।११३ ज्याला शरीराची आसक्ती नाही, ममत्व नाही. परंतु अन्यत्वभाव आहे त्याच्यावर बाह्यवस्तूचा सुद्धा प्रभाव पडत नाही. विषाने मृत्यू होतो परंतु मीराला विष मारू शकले नाही. ज्याच्या एका फुत्काराने मनुष्य राखेचा ढीग बनतो अशा चंडकौशिक सर्पान तीनतीन वेळा महावीरांना डंख केला परंतु महावीरांवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. शरीराची पकड जितकी मजबूत असेल तितका बाह्यवस्तूचा प्रभाव पडतो. चैतन्याप्रती जागृती वाढल्याने शरीर असताना सुद्धा त्याला काही झाले असता चैतन्यावर त्याचा प्रभाव पडत नाही. अन्यत्व भावनेच्या चिंतनाने सूक्ष्म भेद विकल्पानेही वेगळ्या आत्म्याचा अनुभव होतो आणि संयोगरहित सिद्ध पद प्राप्त होते म्हणून चैतन्याप्रती जागृत होऊन अन्यत्व भावनेचे सतत चिंतन केले पाहिजे. ज्ञान दर्शनमय 'स्व' स्वभावाशिवाय ज्ञानावरणिय इत्यादी द्रव्यकर्म, राग-द्वेष इत्यादी भावकर्म आणि शरीर परिग्रह इत्यादी नोकर्म हे सर्व आत्म्याहून भिन्न आहेत. आत्मस्वभाव पुण्य-पाप यांहून वेगळे आहे. अशाप्रकारे अन्यत्वाचे चिंतन केल्याने वस्तूचे ममत्व नष्ट होऊन कर्माचा बंध होणार नाही. आत्मज्योति प्रकट होईल आणि अनिर्वचनीय परमानंदाची प्राप्ती होईल. अशुची भावना ह्यापूर्वी शरीर आणि आत्मा वेगळा आहे ह्याविषयावर विस्तृत विवेचन केले आहे. परंतु तरी सुद्धा ममत्वामुळे संपूर्णतः आसक्ती सुटत नाही. मोक्षमार्गाच्या आराधकाचे लक्ष्य विशुद्ध आत्मस्वरूपाला प्राप्त करण्याचे असते. त्यात स्वजनमोह, परिजनमोह, धनासक्ती आणि देहासक्ती हे अवरोधक तत्त्व असल्याने 'स्व' स्वरूपाचा बोध होत नाही. म्हणून ह्याच्या पूर्व भावनेद्वारे स्वजन, परिजन, धन आणि देहाची अनित्यता अशरणता दाखवून संसाराच्या विचित्रतेचे दिग्दर्शन केले आहे आणि एकत्व व अन्यत्व भावनेद्वारे ह्याची आसक्ती तोडण्याचे उपाय दर्शविले. परंतु प्रत्येक प्राण्याला सर्वात जास्त आसक्ती शरीराची असते. ___मनुष्य जेव्हा संसारातून विरक्त होतो तेव्हा स्वजन, परिजन यांचा तो त्याग करतो. धन, वैभवाचा त्याग करतो. परंतु शरीर तर त्याच्या बरोबरच राहते. साधू. महात्मा, वरुपी, महर्षी यांचे जीवनसुद्धा शरीराबरोबरच असते. ते सुद्धा शरीराचा त्याग करू शकत

Loading...

Page Navigation
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 ... 366