Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि २३
rammar.mmmm १२९ असाधुभ्योऽर्थमादाय साधुभ्यो यः प्रयच्छति ।
आत्मानं संक्रमं कृत्वा कृच्छ्रधर्मविदेव सः ॥१२॥१३२।४ जो राजा ( आपन्न स्थितीत असलेल्या लोकांना ) तरून जाण्याचा एक प्रकारचा सेतुच बनून, दुष्ट लोकांपासून द्रव्य काढून घेऊन तें सुष्ट लोकांना देतो, तोच आपद्धर्म जाणणारा होय. १३० असुहृत्ससुहच्चापि सशत्रुमित्रवानपि ।
सप्रज्ञः प्रज्ञया हीनो दैवेन लभते सुखम् ॥१२॥१७४।२८ स्नेही असोत वा नसोत, मित्र असोत वा शत्रु असोत, बुद्धिहि असो अथवा नसो, तथापि मनुष्यास दैवयोगाने सुखप्राप्ति होते. १३१ अस्यैकपदं मृत्युरतिवादः श्रियो वधः ।। ५।४०१४
एकटा मत्सर मृत्यूला कारण होतो. मर्यादा सोडून भाषण करणे हे लक्ष्मीच्या नाशाला कारण होते. १३२ अस्मिन्महामोहमये कटाहे
सूर्याग्निना रात्रिदिवेन्धनेन । मासर्तुदींपरिघट्टनेन
भूतानि कालः पचतीति वाता॥ ३॥३१३।११८ असे म्हणतात की मोहरूप प्रचंड कढईत दिवसरात्ररूपी सर्पणाने सूर्यरूपी अग्नीवर, मास-ऋतु-रूप पळीने ढवळीत ढवळीत, काल हा सर्व प्राण्यांना शिजवीत आहे. १३३ अहं वो रक्षितेत्युक्त्वा यो न रक्षति भूमिपः ।
स संहत्य निहन्तव्यः श्वेव सोन्माद आतुरः॥१३॥६११३३ 'मी तुमचे रक्षण करीन' असे म्हणून जो राजा त्याप्रमाणे प्रजेचे रक्षण करीत नाही त्याला, सर्वांनी एक होऊन, पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे, ठार करावें. १३४ अहन्यहनि भूतानि गच्छन्तीह यमालयम् ।
शेषाःस्थावरमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम् ॥३॥३१३।११६ रोजच्यारोज मृत्युलोकांतील प्राणी यमसदनास जात असूनहि बाकीचे लोक चिरंजीव आहों असें समजतात, यापरतें आश्चर्य तें कोणते ?
For Private And Personal Use Only