Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि २१ ११७ अष्टादश पुराणानि धर्मशास्त्राणि सर्वशः।
वेदाः साङ्गास्तथैकत्र भारतं चैकतः स्थितम् ॥१८।५।४६ __ अठरा पुराणे, सर्व धर्मशास्त्रे ( स्मृति ) आणि सांग वेद एका बाजूला व एकटें भारत एका बाजूला [ एवढी भारताची योग्यता आहे. ] ११८ असंशयं दैवपरः क्षिप्रमेव विनश्यति ॥ १२॥१०५।२२
दैववादी मनुष्य सत्वर सर्वथा नाश पावतो यांत संशय नाही. ११९ असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥६॥३०॥३५ ( भगवान् श्रीकृष्ण म्हणतात ) हे महाबाहो अर्जुना, खरोखरच मन हे चंचल असून त्याचा निग्रह करणे अति कठीण आहे. तरीपण अभ्यासाने व वैराग्याने ते ताब्यात आणता येते. १२० असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः॥६।२७१९
आसक्ति न ठेवतां कर्म करणारा मनुष्य परमपद खचित प्राप्त करून घेतो. १२१ असतां प्रतिषेधश्च सतां च परिपालनम् ।
एष राज्ञां परो धर्मः समरे चापलायनम् ॥१२।१४।१६ दुष्टांचे निवारण करणे, सजनांचे परिपालन करणे आणि युद्धांत शत्रूला पाठ न दाखविणे हा क्षत्रियांचा श्रेष्ठ धर्म होय. १२२ असतां शीलमेतद्वै परिवादोऽथ पैशुनम् ॥ १२॥१३२।१३ ___ दुसन्यांची निंदा करणे, आणि चुगल्या करणे हा दुर्जनांचा स्वभावच आहे. १२३ असदुच्चैरपि प्रोक्तः शब्दः समुपशाम्यति ।
दीप्यते त्वेव लोकेषु शनैरपि सुभाषितम् ॥१२।२८७१३२ अयोग्य भाषण मोठ्या जोराने केले तरी त्याचे तेज पडत नाही आणि योग्य भाषण हळू केले तरी लोकांत त्याचें तेज पडतेच. १२४ असंतोषः श्रियो मूलम् ॥ २।५५।११
असंतोष हे उत्कर्षाचे मूळ आहे.
For Private And Personal Use Only