Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२२
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१२५ असंत्यागात्पापकृतामपापां
स्तुल्यो दण्डः स्पृशते मिश्रभावात् । शुष्कणाई दह्यते मिश्रभावात्
तस्मात्पापैः सह संधिं न कुर्यात् ॥ ५॥३४७० पापी लोकांचा त्याग केला नाही, तर त्यांच्याशी मिसळल्यामुळे निर्दोषी माणसांनाहि त्यांच्या बरोबरीने दंड सोसावा लागतो. मुक्याबरोबर मिसळल्याने ओलेहि जळून जाते. यास्तव, पापी लोकांशी संबंध ठेवू नये. १२३ असभ्याः सभ्यसंकाशाः सभ्याश्चासभ्यदर्शनाः ।
दृश्यन्ते विविधा भावास्तेषु युक्तं परीक्षणम् ।।१२।११११६५ पुष्कळ असभ्य मनुष्ये सभ्य असल्यासारखी दिसतात व सभ्य असलेली असभ्य दिसतात. नानाप्रकारच्या वस्तु दिसतात. [ त्या तशाच असतात असे नाही ] यास्तव, त्यांची नीट परीक्षा करणे युक्त आहे. १२७ असंभवे हेममयस्य जन्तो
स्तथापि रामो लुलुभे मृगाय । प्रायः समासनपराभवाणां
धियो विपर्यस्ततरा भवन्ति ॥२।७६।५ सोन्याचा मृग असणे संभवत नाही, असे असतांहि श्रीरामचंद्राला सुवर्णमृगाचा मोह पडला ( यावरून असे दिसते की ) बहुतकरून विनाशकाल जवळ आला की, माणसांच्या बुद्धीला भ्रम होतो. १२८ असम्यगुपयुक्तं हि ज्ञानं सुकुशलैरपि ।
उपलभ्यं चाविदितं विदितं चाननुष्ठितम् ।। ५।३९।३४ जे समजून घेणें अवश्य आहे तें जर समजून न घेतले अथवा समजल्यावरहि त्याप्रमाणे वर्तन न केले तर अतिनिपुण पुरुषांनीहि केलेला ज्ञानाचा उपदेश व्यर्थ जाणार.
For Private And Personal Use Only