Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि
१०५ अविसंवादनं दानं समयस्याव्यतिक्रमः ।
१९
आवर्तयन्ति भूतानि सम्यक्प्रणिहिता च वाक् ||५|३८|३६
सरळ बुद्धीनें दिलेलें दान, वचनाचे परिपालन आणि नीट विचार करून केलेलें भाषण यांच्या योगाने सर्व लोक आपलेसे करून घेतां येतात. १०६ अवृत्तिर्भयमन्त्यानां मध्यानां मरणाद्भयम् ।
उत्तमानां तु मर्त्यानामवमानात्परं भयम् || ५ | ३४ /५२ निकृष्ट स्थितींतील लोकांना उपासमारीचें भय वाटतें, मध्यम लोकांना मरणाचें भय वाटते. परंतु उत्तम कोटींतील मनुष्यांना अपमानाचें फार भय वाटतें.
१०७ अवेक्षस्व यथा स्वैः स्वैः कर्मभिर्व्यापृतं जगत् ।
तस्मात्कर्मैव कर्तव्यं नास्ति सिद्धिरकर्मणः || १२|१०|२८
( भीम युधिष्ठिराला म्हणतो ) असें पहा कीं, जगांतील सर्व प्राणी आपआपली कर्मे करण्यांत गुंतलेले आहेत तस्मात्, कर्मच केलें पाहिजे. कर्मावांचून सिद्धि नाहीं. १०८ अव्यापारः परार्थेषु नित्योद्योगः स्वकर्मसु ।
रक्षणं समुपात्तानामेतद्वैभवलक्षणम् || २|५४/७
दुसऱ्याच्या कामांत ढवळाढवळ न करणें, आपल्या कामांत सदा गर्क असणें आणि संपादन केलेल्या द्रव्याचें रक्षण करणें हीं वैभवाची साधनें होत. १०९ अशङ्किन्तेभ्यः शङ्केत शङ्किन्तेभ्यश्च सर्वशः ।
अशङ्कन्याद्भयमुत्पन्नमपि मूलं निकृन्तति ॥ १।१४०/६१
संशयास्पद मनुष्यांवर मुळीच विश्वास ठेवूं नये. इतकेंच नव्हे ज्याच्याविषयीं कोणाला शंका वाटत नाहीं अशाचा देखील विश्वास धरूं नये. कारण विश्वासू, मनुष्याकडून कांहीं संकट उत्पन्न झाले तर तें समूळ नाश करते. ११० अशाश्वतमिदं सर्वं चिन्त्यमानं नरर्षभ ।
कदलीसंनिभो लोकः सारो ह्यस्य न विद्यते ।। ११।३।४ खरोखर विचार केला असता हे सर्व जग अशाश्वत आहे. याची स्थिति केळीसारखी आहे. यांत सार म्हणून कांहींच नाहीं.
For Private And Personal Use Only