Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
९३ अर्थानामीश्वरो यः स्यादिन्द्रियाणामनीश्वरः ।
इन्द्रियाणामनैश्वर्यादैश्वर्यादृश्यते हि सः ॥ ५॥३४॥६३ जो मनुष्य संपत्तीचा मालक असून इंद्रियांचा दास होऊन राहतो तो इंद्रियांवर ताबा नसल्यामुळे ऐश्वर्यापासून भ्रष्ट होतो. ९४ अर्थानारभते बालो नानुबन्धमवेक्षते ॥ २।१५।१४
अज्ञ मनुष्य निरनिराळ्या कामांना हात घालतो पण पुढील परिणामाकडे लक्ष्य देत नाही. ९५ अर्थी तु शक्यते भोक्तुं कृतकार्योऽवमन्यते ।
तस्मात्सर्वाणि कार्याणि सावशेषाणि कारयेत्।।१२।१४००२० कोणत्याहि मनुष्याला आपली गरज आहे तोवरच त्याचा उपयोग करून घेतां येतो. एकदा त्याचे कार्य झाले म्हणजे तो आपली पर्वा करीत नाही. यास्तव कोणतेहि काम पूर्णपणे न करता त्यांतील अवशेष ठेवावा. ९६ अर्थेन हि विहीनस्य पुरुषस्याल्पमेधसः।
विच्छिद्यन्ते क्रियाः सर्वा ग्रीष्मे कुसरितोयथा ॥१२।८।१८ ज्याप्रमाणे ग्रीष्मऋतूंत लहान लहान नद्यांना खांडवे पडतात, त्याप्रमाणे द्रव्यहीन अशा मंदबुद्धि पुरुषाच्या सर्व क्रिया छिन्न विच्छिन्न होऊन जातात. ९७ अर्थेभ्यो हि विवृद्धेभ्यः संभृतेभ्यस्ततस्ततः ।
क्रियाः सर्वाः प्रवर्तन्ते पर्वतेभ्य इवापगाः॥१२।८।१६ पर्वतांपासून नद्या उगम पावतात त्याप्रमाणे सर्व बाजूंनी द्रव्य संपादन करून त्याची वाढ झाली म्हणजे त्यापासून सर्व कार्ये सिद्ध होतात. ९८ अर्थे सर्वे समारम्भाः समायत्ता न संशयः ।
स च दण्डे समायत्तः पश्य दण्डस्य गौरवम्॥१२।१५।४८ (अर्जुन युधिष्ठराला म्हणतो) सर्व प्रकारचे उद्योग द्रव्यावर अवलंबून आहेत यांत संशय नाही. आणि ते द्रव्य दंडाच्या (नियामक शक्तीच्या ) अधीन आहे. यावरून दंडाची थोरवी केवढी आहे पहा !
म. भा. २
For Private And Personal Use Only