Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
८८ अर्थयुक्त्या हि जायन्ते पिता माता सुतस्तथा ।
मातुला भागिनेयाश्च तथा संबन्धिबान्धवाः । १२॥१३८।१४५ आई, बाप, मुलगा, मामे भाचे, तसेच इतर संबंधी आणि बांधव हे सर्व द्रव्याच्याच संबंधाने परस्पर (प्रीतियुक्त ) होत असतात. ८९ अर्थसिद्धि परामिच्छन् धर्ममेवादितश्चरेत् ।
न हि धर्मादपैत्यर्थः स्वर्गलोकादिवामृतम् ॥५:३७/४८ पुष्कळ द्रव्य मिळावे अशी इच्छा करणाऱ्याने प्रथम धर्माचेंच आचरण करावें, कारण, स्वर्गलोकाला सोडून जसें अमृत जात नाही तसा अर्थ ( द्रव्य ) धर्माला सोडून रहात नाही. ९० अर्थस्य पुरुषो दासो दासस्त्वर्थो न कस्यचित् ।।
इति सत्यं महाराज बद्धोऽस्यर्थेन कौरवैः ॥ ६४३।४१ ('तुम्ही कौरवांचा पक्ष कां सोडीत नाही ? ' या युधिष्ठिराच्या प्रश्नाला भीष्मद्रोणादिकांनी दिलेले उत्तर ) पुरुष हा अर्थाचा दास आहे, अर्थ कोणाचाहि दास नाहीं. ह्यास्तव, खरोखर, हे राजा ! मी अर्थामुळे कौरवांशी बांधला गेलों आहे. ९१ अर्थागमो नित्यमरोगिता च
प्रिया च भार्या प्रियवादिनी च । वश्यश्च पुत्रोऽर्थकरी च विद्या ।
षड् जीवलोकस्य सुखानि राजन् ।। ५।३३।८२ (विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे राजा, सदोदित द्रव्यप्राप्ति, निकोप प्रकृति, मधुर भाषण करणारी प्रेमळ स्त्री, आज्ञाधारक पुत्र व धनोत्पादक विद्या ही सहा मृत्युलोकांतील सुखें होत. ९२ अर्थाद्धर्मश्च कामश्च स्वर्गश्चैव नराधिप। ..
प्राणयात्रापि लोकस्य विना ह्यर्थं न सिध्यति ॥१२।८।१७ (अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो)अर्थ (द्रव्य) असेल तर धर्म, काम आणि स्वर्ग यांची प्राप्ति होते. फार काय, पण लोकांची जीवितयात्रा देखील अर्थावांचून चालणार नाही.
For Private And Personal Use Only