Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
८२ अरक्षितारं राजानं बलिषड्भागहारिणम् ।
तमाहुः सर्वलोकस्य समग्रं पापचारिणम् ॥१२१३९ जो राजा प्रजेचे रक्षण न करितां प्रजेपासून उत्पन्नाचा सहावा भाग कर म्हणून घतो तो [ त्या कराच्या रूपानें ] सर्व प्रजेचें पापच ग्रहण करतो असे म्हणतात. ८३ अरक्षितारं हारं विलोप्तारमनायकम् ।
तं वै राजकलिं हन्युः प्रजाः संना निघृणम् ॥ १३॥६११३२ प्रजेचे रक्षण न करितां तिजपासून जो कर घेतो, व प्रजेला सन्मार्गाला न लावितां जो लुबाडतो तो राजरूपी कली प्रजेनें सज्ज होऊन निष्ठुरपणे ठार मारावा. ८४ अरण्ये विजने न्यस्तं परस्वं दृश्यते यदा ।
मनसापि न हिंसन्ति ते नराः स्वर्गगामिनः॥१३॥१४४।३१ अरण्यांत एकीकडे पडलेले दुसऱ्याचे द्रव्य दृष्टीस पडलें असतांही जे लोक मनानेंसुद्धा त्याचा अभिलाष धरीत नाहीत ते स्वर्गाला जातात. ८५ अराजकेषु राष्ट्रेषु धर्मो न व्यवतिष्ठते ।।
परस्परं च खादन्ति सर्वथा धिगराजकम् ॥ १२॥६७।३ राजा नसलेल्या राष्ट्रामध्ये धर्म रहात नाही. तसेंच लोक एकमेकांना फाडून खातात. अराजकतेला सर्वथा धिक्कार असो ! ८६ अरिणापि समर्थेन संधिं कुर्वीत पण्डितः ।
मूषिकश्च बिडालश्च मुक्तावन्योन्यसंश्रयात् ॥१२॥१३८।२०३ सुज्ञ मनुष्याने शत्रु सामर्थ्यसंपन्न असल्यास त्याच्याशीहि संधि करावा. परस्परांचा आश्रय केल्यानेच मूषिक आणि मार्जार हे उभयतांहि संकटांतून मुक्त झाले. ८७ अर्थं महान्तमासाद्य विद्यामैश्वर्यमेव वा।
विचरत्यसमुन्नद्धो यः स पण्डित उच्यते ॥ ५।३३।४० विपुल संपत्ति, विद्या किंवा अधिकार प्राप्त झाला असतां जो निरभिमान वृत्तीने वागतो त्याला पंडित म्हणावें.
For Private And Personal Use Only