Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१४
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७६ अमर्षजो हि संतापः पावकादीप्तिमत्तरः ३ | ३५।११ असहिष्णुतेमुळे होणारा संताप अग्नीपेक्षांहि अधिक प्रखर असतो. ७७ अमित्रमुपसेवेत विश्वस्तवदविश्वसन् ।
प्रियमेव वदेन्नित्यं नाप्रियं किंचिदाचरेत् ।। १२|१०३ ९
( बृहस्पति इंद्राला म्हणतात. ) शत्रूवर विश्वास न ठेवतां विश्वास ठेवल्याचा बहाणा करून त्याच्या कलानें वागावें. त्याच्याशीं सदा गोड बोलावें, व त्याला न रुचणारी कोणतीहि गोष्ट करूं नये.
७८ अमित्रो न विमोक्तव्यः कृपणं बह्वपि ब्रुवन् ।
कृपा न तस्मिन्कर्तव्या हन्यादेवापकारिणम् ||१|१४०/२२ शत्रु अगदीं दीनवाणीनें बोलूं लागला तरी त्याला मोकळा सोडूं नये. त्याच्यावर दया न करतां त्या अपकार करणाऱ्याला ठार मारावें.
७९ अमित्रो मित्रतां याति मित्रं चापि प्रदुष्यति ।
सामर्थ्ययोगात्कार्याणामनित्या वै सदा गतिः १२।१३८।१३
कार्याच्या महत्त्वाच्या मानानें शत्रुहि मित्र होतात व मित्रहि शत्रु होतात. कारण, कोणतीहि स्थिति ही कायमची अशी नसतेच.
८० अमृतस्येव संतृप्येदवमानस्य तत्त्ववित् ।
विषस्येवोद्विजेन्नित्यं संमानस्य विचक्षणः || १२|२२९/२१ तत्त्ववेत्त्या पुरुषाला अपमान झाला तर अमृतप्राप्ति झाल्याप्रमाणें संतोष वाटला पाहिजे. व शहाण्याने विषाप्रमाणे सन्मानाचा तिटकारा मानला पाहिजे.
८१ अयुध्यमानो म्रियते युध्यमानश्च जीवति ।
कालं प्राप्य महाराज न कश्चिदतिवर्तते ।११/२/५
( भारतीय युद्धानंतर विदुर धृतराष्ट्राचे सांत्वन करतो ) हे राजा, रणांत पाऊल न टाकणाराहि मरून जातो, आणि घनघोर रणकंदन करूनहि मनुष्य जिवंत राहूं शकतो. सारांश काळ आल्यावर त्याचा प्रतिकार कोणालाहि करितां यावयाचा नाहीं.
3
For Private And Personal Use Only