________________
समाजकी सच्ची सेवा ।
[३६९
दक्षिण महाराष्ट्र जैनसमाजातर्फे मानपत्र. श्रीयुत माणिकचंद हिराचंद जव्हेरी
मुंबई जैनप्रांतिक सभेचे सभापति यांस. श्रीमन्माणिक्यचंद्रो जयतु भुवि सदा रश्मिमिः स्वोपकारैः ।
जैनाः सर्वे समुद्रा इव बहु मुदिता यांतु वृद्धिं तमेक्ष्य ॥१॥ महाशय ! ___ या प्रांतांत आपण प्रस्तुत वर्षाच्या जैनपरिषदेकरितां आमच्या आमंत्रणास मान देऊन केलेल्या आगमनाने येथील आपल्या धमबांधवास अनुग्रहीत केल्याबदल त्यांचेतर्फे आमीं आज फार आनंदाने आपले मनःपूर्वक आभार मानितो. संसारांत मनुष्यांस सतत भोगाव्या लागणा-या दुष्प्रसंगांस अलीकडे आपणांस टक्कर देणे भाग पडले असतांही आपण आपल्या धीर स्वभावास अनुसरून धर्मकृत्यांत आपले मन स्थिर ठेविले आणि आमच्या अल्पशा सार्वजनिक चळवळींना उत्तेनन देण्यासाठी हा त्रासदायक प्रवास स्वीकारिला, हे आह्मांवर आपले उपकार आहेत.
या उपकारास मागे सारणाऱ्या आपल्या अनेक सत्कार्याचे आणि त्यांचे मूल आपल्या सच्छोलाचे स्मरण या प्रसंगी सहजच होते. धर्मबांधवांविषयी प्रेम, जात्युन्नतीची उत्कंठ इच्छा, साधे व प्रेमळ आचरण, गरीबांविषयी सहानुभूति आणि अपार औदार्य या गुणांची केवळ जिवंत मूर्तीच आज आमच्या भाग्योदयाने जैनसमाजांत उदय पावली आहे असे आपल्या सहस्रावधि धर्मबांधवांना वाटत आहे.
दक्षिणेतील गरीब विद्यार्थ्यास द्रव्यद्वारे साह्य देऊन, प्रसंगी
२४ Jain Education International
For Personal & Private Use Only
www.jainelibrary.org