________________
wimwwwmwwwwww
महती जातिसेवा प्रथम भाग । [४४१ स्वा० क. फलटण ), ४. दोशी रूपचंद लखमीचंद, ५. शा० रामचंद सुरचंद.
नकल मानपत्र (रुकडी) श्रीमत्सकलगुणगणसंपन्न राजमान्य राजच्छी शेट माणिकचंद पानाचंद जव्हेरी मुंबई
जस्टिस ऑफ धी पीस् । यांचे सेवेसी-रुकडी गांवचे आम्ही सम्मस्त श्रावक व इतरजन आपले अभिनन्दन करितों की----
आपली धर्मसंबंधी व इतर औदार्याची कीर्ति सरकारचे कानावर जाऊन त्यांनी आपला थोरपगा मनांत आणुन सरकारांनी आपल्यास 'जस्टिस आफ धी पीस' ही बहु मानाची पदवी दिली. असे आम्हांस कळल्यावरून आम्हांस फार आनंद झाला व यानबद्दल आम्ही सर्व जैन व ब्राह्मण वगैरे लोक श्रीजीनाचे मंदिरांत जमून आनंदप्रदर्शक सभा भरवून आपल्या थोरपणास उचित असा मान मिळाल्या बद्दल आनंद मानला, व सरकारचे आभार मानिले, आणि आपले असेंच यशस्कर व जनांस सुखकर असे आयुष्य वृद्धिंगत होवो मणुन परामेश्वराची प्रार्थना केली.
हा आनंद आपल्यास कळविण्याकरितां हैं अभिनंदनपर पत्र आह्मीं नम्रता पूर्वक आपल्यास लिहून पाठविले आहे. ते आमचे तर्फे चिरंजीव रा० रा. बाबगोंडा आणा पाटील रुकडीकर हे आपणास अर्पण करितील, त्याचा आपण प्रेमाने स्वीकार करावा अशी विनंति आहे. कृपा लोभ असावा ही विनति. ता० २१ मार्च १९०६
____ आपले-रुकडीकर समस्त श्रावक व इतर मंडली
Jain Education International
For Personal & Private Use Only
www.jainelibrary.org