________________
महती जातिसेवा प्रथम भाग । [४३९ मोठे उपकार आहेत. या प्रयत्नाने लुल्या पडलेल्या भारतीय जैनसमाजांत चेतना उत्पन्न होऊन त्या योगाने ह्या प्राचीन जैन समानाचा अभ्युदय होईल अशी आम्हांस खात्री आहे. हे लक्षात घेऊनच इतर जातींतील पुढारी आपल्या सत्कृत्याचे अभिनंदन करितात, याचे ढळक उदाहरण येथील प्रभु श्रीमान् सरकार हेच होत. त्यांनी केलेल्या आपल्या सत्कारास कारण आपली थोरवी तर आहेच पण ही गोष्ट जैनजातीच्या उन्नती विषयींच्या त्यांच्या कळकळीची एक साक्ष आहे याबद्दल आह्मीं समस्त जैनलोक श्रीमंत सरकारचे ऋणी आहोत. ___ मुंबई या सूरत सारख्या मोठ्या व्यापार प्रसिद्ध व जेथें जैन व जैनेतर हिंदू तीर्थवासी यांनां उतरल्याशिवाय गत्यन्तरच नाही असे मटले तरी चालेल, अशा ठिकाणी हिराबाग धर्मशाळेसारख्या भव्य धर्मशाला बांधून उतारू लोकाची गैरसोय नाहींशी केली. अशा रीतिने जैन व जैनेतर समाजावर ही अनेक उपकार केले आहेत।
ह्या आपल्या दानशौडित्वाबद्दलच स्पृहणीय प्रख्याती झाली आहे, असे नहीं. आपले सौजन्य, आपली जैनधर्माविषयी अपार श्रद्धा, जैनसमानाच्या उन्नति विषयी आपले अव्याहत परिश्रम आणि आपल्या समाजांतील अनाथ व गरजू लोकांस मदत करण्याविषयी आपली निरलस तत्परता इत्यादि अनेक गुणामुळे आपण सर्व समाजास पूज्य व प्रिय झालेले आहां.
मुंबई दिगम्बर जैन प्रांतिक सभा, द० म० जैन परिषद्, भातरवर्षीय दि० जैन महासभा इत्यादि सभांचे अध्यक्ष, मुंबई
Jain Education International
For Personal & Private Use Only
www.jainelibrary.org