________________
४४० ] अध्याय दशों शहरातील 'जस्टिस ऑफ दी पीस', तीर्थक्षेत्रप्रबंधकारिणी सभेचे महामंत्री इत्यादि अनेक जबाबदारीची, व समाजोपयोगी कामें अंगावर घेऊन इतर कोणासही न करितां येतील अशा उत्तम त-हेन व प्रचण्ड स्वार्थत्याग करून आपण ती बजाविली आहेत व त्यामुळे आपण सर्व जैनसमाजास कायमचे आपले ऋणी करीत आहां.
आपल्या अंगच्या सद्गुणांचे वर्णन करणे अशक्य जाणून त्या उद्योगास न लागतां शेवटी आमांस इतकेच सांगावयाचे आहे की आपला कित्ता थोडाबहुत तरी बळविण्याची आमच्यांतील पुढारी लोकांस आपले तेजस्वी उदाहरण पाहून इच्छा जाहल्यास समाजाने आपल्या उपकारांविषयी थोडी तरी कृतज्ञता दर्शविली असे होईल. आपल्या अपार औदार्याचे अनुकरण करण्यासारखी सुस्थिति जरी फारच अपूर्व असली तरी आपला साधेपणा, निरलसपणा, वगैरे गुणांत आपला कित्ता पुढे ठेवण्याचे काम तरी प्रत्येकाने केले पहिजे. ___असा कित्ता आमच्या पुण्योदयाने आम्हांस आज सजीव स्वरूपाचा मिळाला आहे तो असाच आमच्या पुढे चिरकाल राहो, अशी आमची परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. आपल्यास व आपल्या कुटुम्बास शुभ कर्मजनित सर्व फलें अखण्ड प्राप्त होवोत अशी जैनसमाजाची इच्छा पुनरपि प्रदर्शित करून, हे मानपत्र आपल्यास सादर करावयाची परवानगी घेत आहों. फलटण. एप्रील १९०७.
__ आपले कृपाभिलाषी-फलटण दि० जैनसमाज तर्फे
१. शेठ दोशी माणिकचंद रावजी, २. होचंद माणिकचंद दोशी वकील, ३. शा० रामचंद हेमचंद ( अध्यक्ष
Jain Education International
For Personal & Private Use Only
www.jainelibrary.org