________________
४२८ ]
अध्याय दशवां । सुशोभित करून व अखिल भारतीय जैन मंडळाचे धन्यवाद संपादन करून आपण येथे आला आहां. अशा प्रसंगी आपले अपूर्व औदार्य, अप्रतिम समाप्रम, अढळ धर्मतत्परता इत्यादि सद्गुण पाहून आह्मां दाक्षिणात्य जैनसंघांत जो हर्षोद्रेक होत आहे त्याला आपल्यापुढे आमी थोडी वाट करून देत आहों याबद्दल क्षमा करावी अशी विनंती आहे.
जैन समाजांत आपले स्थान अनभिषिक्त राजाचेच आहे असे म्हणण्यास आझांस बिलकुल शंका नाही. आपल्या समाजाविषयीं उण्कंठ प्रीति आपल्या अंतःकरणांत प्रज्वलित आहे; व या प्रीतीला दृश्य फल कोणत्या उपायांनी मिळेल हे ठरविण्यास आपले मन रात्रंदिवस उद्युक्त असते, आपले विचार प्राचीन आचार्यप्रणीत शास्त्राविषयीं अचल भक्तीने युक्त असल्यामुळे जैन शासनाच्या सनातन तत्वांचे पुनरुज्जीवन करण्यास आपण तत्पर आहां. तसेच परिस्थितीच्या भेदामुळे ज्या नवीन सुधारणांची समानास अवश्यकता आहे त्याहि आपण पूर्णपणे जाणत आहां. आणि या सर्व ज्ञानास कृतीत उतरविण्यास ज्या साधनांची अवश्यकता असते ती आपल्यास पूर्णत्वाने लाभली आहेत. तात्पर्य कुशाग्र बुद्धी, सदय अंतःकरण, उदार वासना, यथेच्छ संपत्ती, अखंड कीर्ति इत्यादि सद्गुणामुळे व सामग्रीमुळे आज आमच्या समाजांत आपण उच्चतम पदावर स्वभावतःच विराजमान झाला आहां.
आपण समाजहितासाठी आजवर सहासात लक्ष रुपये खर्चिले आहेत. आणि ते अशा प्रकारे खर्चिले आहेत की त्यांचा उपयोग चिरकाल सर्व समाजास उत्तमप्रकारे होत राहील. यामुळे आपले
Jain Education International
For Personal & Private Use Only
www.jainelibrary.org