Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१०)
महापुराण
(२५-६०
कामशत्रुहणं देवमामनन्ति मनीषिणः । त्वामानमत्सुरेण्मौलिभामालाभ्यचितक्रमम् ॥ ६८ ध्यानद्रुघणनिभिन्नघनघातिमहातरुः । अनन्तभवसन्तानजयावासीवनन्तजित् ॥ ६९ त्रैलोक्यनिर्जयावाप्तदुर्दर्पमतिदुर्जयम् । मृत्युराजं विजित्यासीज्जिनमृत्युञ्जयो भवान् ॥ ७० विधुताशेषसंसारबन्धनो भव्यबान्धवः । त्रिपुरारिस्त्वमेवासि जन्ममृत्युजरान्तकृत् ॥ ७१ त्रिकालविषयाशेषतत्त्वभेदात्रिघोत्थितम् । केवलाख्यं दषच्चक्षुस्त्रिनेत्रोऽसि त्वमोशितः ॥ ७२ त्वामन्धकान्तकं प्राहुर्मोहान्धासुरमर्दनात् । अब ते नारयो यस्मादर्धनारीश्वरोऽस्यतः ॥७३ शिवः शिवपदाध्यासादुरितारिहरो हरः । शङकरः कृतशं लोके शम्भवस्त्वं भवन्सुखे ॥७४
हे भगवंता, आपणास विद्वान् लोक कामशत्रूचा नाश करणारा देव आहात असे मानतात. आपण नमस्कार करणान्या देवेन्द्रांच्या किरीटांच्या कान्तिरूपी मालांनी आपले चरण पूजले जातात असे आहात ॥ ६८ ॥
__ध्यानरूपी मोठी धारदार जी कुन्हाड तिने धन-चिवट असा जो घातिकर्मरूपी वृक्ष तो समूळ छेदून टाकला आहे. असे आपले स्वरूप आहे व आपण अनन्त जी संसाराची परम्परा तिचा नाश केल्यामुळे अर्थात् तिला जिंकल्यामुळे आपण अनन्तजित् आहात ।। ६९ ।।
सगळ्या त्रैलोक्याला जिंकल्यामुळे ज्याला अतिशय दुष्ट गर्व प्राप्त झालेला जो आहे व त्यामुळे जो जिंकण्यास अतिशय कठिण आहे, अशा मृत्युराजाला जिंकून हे जिनदेवा, आपण खरोखर मृत्युञ्जय झालेले आहात ॥ ७० ॥
. हे प्रभो, आपण संसारात जखडून टाकणारी जी बंधने-मिथ्यात्व, अविरति, प्रमाद, कषाय आदिक ती तोडून टाकली आहेत व आपण रत्नत्रयप्राप्तियोग्य अशा भव्यांचे बंधुहितकर्ते आहात. आपण जन्म, मरण व जरा-वृद्धावस्था यांचा नाश केला म्हणून आपण त्रिपुरारि आहात ॥ ७१ ॥
भूत, भविष्य, वर्तमान या तीन कालांना विषय झालेल्या संपूर्ण जीवादिक तत्त्वांच्या भेदामुळे तीन प्रकाराने प्रकट झालेले जे केवलज्ञान हाच जो डोळा तो हे ईशा आपण धारण केला आहे म्हणून आपण त्रिनेत्र' आहात. तीनही कालाच्या समस्त जीवादिक विषयांना आपला केवलज्ञानरूपी डोळा जाणतो म्हणून आपण त्रिनेत्र आहात ।। ७२ ।।
हे प्रभो, मोहरूपी अंधासुराचा आपण नाश केला म्हणून आपणास अन्धकान्तक म्हणतात. व हे प्रभो, अष्ट कर्मशत्रुपैकी अर्धे म्हणजे चार ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय आणि अन्तराय हे घातिकर्मरूपी शत्रु आपण नष्ट केले व ईश्वरपणा-त्रैलोक्य स्वामित्व मिळविले म्हणून आपणास अर्ध न-अरि ईश्वर-अर्थात् अर्धनारीश्वर म्हणतात ।। ७३ ।।
हे आदिप्रभो, आपण शिवपदात-मोक्षपदात निवास करता म्हणून आपणास शिव म्हणतात. आपण दुरितारि-पापरूपी शत्रूचा नाश केल्यामुळे 'हर' आहात. जगात कृतशं आपण शान्ति उत्पन्न केली म्हणून शंकर आहात व सुखामध्ये उत्पन्न झालेले आहात म्हणून आपण शंभव आहात ।। ७४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org