Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
( २५-५२
गुणिनस्त्वामुपासीना निर्धूतगुणबन्धनाः । त्वया सारूप्यमायान्ति स्वामिच्छन्दन्तु शिक्षितुम् ॥ अथ मन्दानिलोद्धूतचलच्छारवाकरोत्करः । श्रीमानशोकवृक्षस्ते नृत्यतीवात्तसंमदः ॥ ५३ चलत्क्षीरोदवीचीभिः स्पर्धाङ्कर्तुमिवाभितः । चामरौघाः पतन्ति त्वां मरुद्भिर्लीलया घृताः ॥५४ मुक्तालम्बनविभ्राजि भ्राजते विधुनिर्मलम् । छत्रत्रयं तवोन्भुक्तप्ररोहमिव खाङ्गणे ।। ५५ सिरूढं विभातीवं तव विष्टरमुच्चकैः । रत्नांशुभिर्भवत्स्पर्शान्मुक्तहर्षाङकुरैरिव ॥ ५६ स्वनन्ति मधुरध्वानाः सुरदुन्दुभिकोटयः । घोषयन्त्य इवापूर्य रोदसी त्वज्जयोत्सवम् ॥ ५७ तव दिव्यवन धीरमनुकर्तुमिवोद्यताः । ध्वनन्ति सुरतूर्याणां कोटयोऽर्द्धत्रयोदश ॥ ५८ ॥ सुरैरियं नभोरङ्गात्पौष्पी वृष्टिवितन्यते । तुष्टया स्वर्गलक्ष्म्येव चोदितैः कल्पशाखिभिः ॥ ५९ तव देहप्रभोत्सर्पः समाक्रामन्नभोऽभितः । शश्वत्प्रभातमास्थानीजनानां जनयत्ययम् ॥ ६०
८)
महापुराण
हे प्रभो, अन्य सर्व गुणरूपी बंधनाचा त्याग करून केवळ आपलीच उपासना करणारे गुणी लोक आपल्यासारखेच रूप प्राप्त करून घेत आहेत व हे योग्यच आहे की, स्वामीलागुरूला अनुसरून चालणे हे शिष्यांचे-सेवकांचे कर्तव्य आहे ।। ५२ ।
हे जिनदेवा, मंदवान्यांनी हालविल्यामुळे चंचल झालेल्या फांद्यारूपी हातांच्या समूहांनी हा सुंदर अशोकवृक्ष आनंदाने जणु नृत्य करीत आहे असा दिसत आहे ।। ५३ ।।
देवांनी लीलेने हातात घेतलेले हे चामरांचे समूह क्षीरसमुद्राच्या चंचल लहरीबरोबर जणु स्पर्धा करण्यासाठी आपणावर चोहोकडून वारले जात आहेत ॥ ५४ ॥
हे भगवंता, मोत्यांच्या झालरींनी शोभणारे व चन्द्राप्रमाणे शुभ्र असे आपले छत्रत्रय आकाशरूपी अंगणात जणु त्याला अंकुर उत्पन्न झाले आहेत असे शोभत आहे ।। ५५ ।।
हे जिनराज, सिंहांनी धारण केलेले हे आपले सिंहासन वर पसरलेल्या रत्नांच्या किरणांनी व्याप्त झाल्यामुळे आपल्या स्पर्शाने जणु त्याला हर्षाङकुर फुटले आहेत असे दिसत आहे ॥ ५६ ॥
हे जिननाथा, ज्यांचा अवाज मधुर आहे असे कोट्यवधि देवनगारे तुझ्या जयोत्सवाचा घोष करून जणु आकाश व पृथ्वी यांना भरून टाकीत आहेत असे वाटते ।। ५७ ।।
हे जिनप्रभो, देवांची साडेबारा कोटि नगारे आदिक वाद्ये आपल्या गंभीर दिव्यध्वनीचे अनुकरण करण्यासाठी जणु उद्युक्त होऊन वाजत आहेत असे वाटते ।। ५८ ।।
आकाशरूपी रंगभूमीपासून देव जी पुष्पवृष्टि करीत आहेत ती आम्हाला अशी वाटत आहे की, जणु आनंदित झालेल्या स्वर्गलक्ष्मीने प्रेरिलेले कल्पवृक्षच ती पुष्पवृष्टि करीत आहेत ।। ५९ ।।
हे भगवंता, तुझ्या देहाच्या पसरलेल्या कांतीने सर्व आकाश चोहीकडून व्याप्त झालेले आहे. त्यामुळे आपल्या समवसरणसभेत बसलेल्या लोकांना तो कांतिसमूह नेहमी प्रभातकालची शोभा उत्पन्न करीत आहे असे वाटते ॥ ६० ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org