Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
६)
( २५-३७
गगनानुगतं यानं तवासीद्भुवमस्पृशत् । देवासुरभरं सोढुमक्षमा घरणीति नु ॥ ३७ क्रूरैरपि मृगैस्त्रैिर्हन्यन्ते जातु नाङ्गिनः । सद्धर्मदेशनोद्युक्ते त्वयि सज्जीवनौषधौ ॥ ३८ न भुक्तिः क्षीणमोहस्य तवात्यन्तसुखोदयात् । क्षुत्क्लेशबाधितो जन्तुः कवलाहारभुग्भवेत् ॥३९ असद्योदयाद्भुक्ति त्वयि यो योजयेदधीः । सोहानिलप्रतीकारे तस्यान्वेष्यं जरद्धृतम् ॥ ४० असद्वेद्यविषं घातिविध्वंसध्वस्तशक्तिकम् । त्वय्यकिञ्चित्करं मन्त्रशक्त्येवापबलं विषम् ॥ ४१ असद्योदय घातिसहकारिव्यपायतः । त्वय्यकिञ्चित्करो नाथ सामग्रया हि फलोदयः ॥४२ नेतयो नोपसर्गाश्च प्रभवन्ति त्वयीशितः । जगतां पालके हेलाक्षालितांहः कलङ्कके ॥ ४३ त्वय्यनन्तसुखोत्सर्पत्केवलामललोचने । चातुरास्यमिदं युक्तं नष्टघातिचतुष्टये ॥ ४४
महापुराण
हे जिनदेवा, आपले गमन पृथ्वीला जमिनीला स्पर्श न करता आकाशांतून होत असते. पृथ्वी देवांच्या व असुरांच्या ओझ्याला सहन न करणारी जणु असते ? ।। ३७ ।।
हे प्रभो, आपला सद्धर्माचा उपदेश संजीवनी औषधाप्रमाणे असल्यामुळे क्रूर व हिंसक अशा प्राण्याकडूनही प्राणी कधीहि बिलकुल हिंसिले जात नाहींत ॥ ३८ ॥
आपण मोहकर्माचा नाश पूर्णपणे केल्यामुळे आपणास अत्यन्त अनन्तसुखाची प्राप्ति झाली आहे. म्हणून आपण आहार घेत नाही. बरोबरच आहे कीं, जेव्हा भुकेच्या क्लेशाने प्राणी पीडित होतो त्यावेळी तो अन्नाचे घास खात असतो, आहार घेत असतो ।। ३९ ॥
हे जिनेन्द्रा, असातावेदनीय कर्माच्या उदयामुळे आपण आहार घेता असे जो मूर्ख म्हणतो त्याला मोहरूपी वाताचा झटका आला आहे. त्याचा तो झटका घालविण्यास जुने तूप हे औषध हुडकले पाहिजे. पण असद्वेदनीय कर्मविष घातिकर्माचा नाश झाल्यामुळे शक्तिहीन झाले आहे. असले शक्तिहीन असमर्थ असातावेदनीय हे प्रभो, आपल्या ठिकाणी क्षुधेचे दुःख उत्पन्न करण्यास असमर्थ आहे. जसे मंत्राच्या सामर्थ्याने ज्याचे सामर्थ्य नष्ट झाले आहे असे विष आपले प्राणनाशकार्य करू शकत नाही तसे असातावेदनीय कर्म केवलीच्या ठिकाणी क्षुधा उत्पन्न करू शकत नाही. असे घातिकर्म नष्ट झाल्यामुळे तो असातावेदनीय कर्मांचा उदय प्रभो, आपल्या ठिकाणी क्षुधारूपकार्य उत्पन्न करण्यास असमर्थ आहे. कारणांची सर्व सामग्री मिळाली म्हणजे फल उत्पन्न होते, कार्य उत्पन्न होते ।। ४०-४२ ।।
हे ईशा, आपण जगाचे रक्षक आहा व आपण सहजरीतीने पातकरूपी कलंक धुऊन टाकला आहे. म्हणून आपण विहार करीत असता अतिवृष्टि होणे, बिलकुल वृष्टि न होणे वगैरे भीतींची कारणे आणि देवकृत पीडा, मनुष्यकृत पीडा, क्रूरपशुकृत पीडा, वगैरे उपद्रवांचे सामर्थ्य आपल्या ठिकाणी निरुपयोगी होते. अर्थात् हे उपसर्गादिक आपण विहार करीत असता बिलकुल होत नाहीत ॥ ४३ ॥
हे प्रभो, आपल्या केवलज्ञानरूपी नेत्राने अनंत रूपे धारण केली आहेत. अर्थात् आपले केवलज्ञान अनंत ज्ञेयांना जाणून चोहोकडे पसरले आहे. तथापि आपली चार घातिकर्मे नष्ट झाल्यामुळे आपणास चातुरास्य- चार मुखे होणे असणे योग्यच आहे ।। ४४ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org