Book Title: Mahapurana Part 2 Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan MaharashtraPage 16
________________ २५-३६) तव वागमृतं पीत्वा वयमद्यामराः स्फुटम् । पीयूषमिदमिष्टं नो देव सर्वरुजाहरम् ॥ २९ जिनेन्द्र तव वक्त्राब्जं प्रक्षरद्वचनामृतम् । भव्यानां प्राणनं भाति धर्मस्यैव निधानकम् ॥ ३० मुखेन्दु मण्डलाद्देव तव वाक्किरणा इमे । विनिर्यान्तो हतध्वान्ताः सभामाह्लादयन्त्यलम् ॥ ३१ चित्रं वाचां विचित्राणामक्रमः प्रभवः प्रभोः । अथवा तीर्थकृत्वस्य देव वैभवमीदृशम् ॥ ३२ अस्वेदमलमाभाति सुगन्धि शुभलक्षणम् । सुसंस्थानमरक्तासृग्वपुर्वज्रस्थिरं तव ॥ ३३ सौरूप्यं नयनाह्लादि सौभाग्यं चित्तरञ्जनम् । सुवाक्त्वं जगदानन्दि तवासाधारणा गुणाः ॥ अमेयमपि ते वीर्यं मितं देहे प्रभान्विते । स्वरूपेऽपि दर्पणे बिम्बं माति स्ताम्बेरमं ननु ॥ ३५ त्वदास्थान स्थितोद्देशं परितः शतयोजनम् । सुलभाशनपानादि त्वन्महिम्नोपजायते ॥ ३६ महापुराण हे जिननाथा, तुझे वचनामृत पिऊन आज खरोखर आम्ही अमर झालो. हे आपले वचनामृत आम्हाला खरोखर फार आवडले आहे आणि सर्व जन्मजरामरणादि रोग नाहीसे करणारे आहे ।। २९॥ हे जिनेन्द्र, ज्यातून वचनामृत स्रवत आहे व जे धर्माचा जणु निधान - खजिना आहे असें आपले मुखकमल भव्यांना जणु जीवनाप्रमाणे आनंदित करणारे आहे ॥ ३० ॥ हे जिनदेवा, आपल्या मुखचन्द्रमण्डलापासून हे वचनरूपी किरण बाहेर पडतात व ते अज्ञानान्धकाराचा नाश करतात. समवसरणसभेतील सर्व प्राण्यांना अतिशय आनन्दित करितात ॥ ३१ ॥ हे जिनदेवा, आपल्या वाणीचा ओघ एकसारखा चालू होतो व त्यात क्रमाने अमुक बोलावयाचे असा संकल्प आधी केलेला नसतो. अर्थात् इच्छापूर्वक बोलणे - उपदेश आपला नसतो. हे प्रभो, आपल्या तीर्थंकरनाम कर्माचे वैभव असे अनिर्वचनीय आहे ।। ३२ ।। आपले शरीर धामरहित आणि मलरहित आहे. ते सुगन्धी व शुभ लक्षणांनी युक्त आहे. ते शरीर चतुरस्रसंस्थानाचे असते. त्याच्या सर्व अवयवांची रचना अतिशय प्रमाणबद्ध असते. हे देवा, हे आपले शरीर तांबड्या रक्ताने रहित व वज्रर्षभनाराच संहनाने युक्त आणि स्थिर - दृढ मजबूत असते ।। ३३ ।। आपले सुंदर रूप डोळयांना आनन्द देणारे असते. आपले सौभाग्य मनास अनुरक्त करणारे असते. आपले उत्तम वक्तृत्व जगाला आनन्दित करणारे असते. हे प्रभो, आपले गुण असाधारण आहेत ॥ ३४ ॥ हे जिननाथा, आपल्या कान्तिसम्पन्न शरीरात अप्रमाण असेही बल-सामर्थ्य मावले आहे. बरोबरच आहे कीं, लहानशा दर्पणात देखील हत्तीचे फार मोठे शरीरप्रतिबिम्ब मावत असतेच की ।। ३५ ॥ जेथे आपले समवसरण आले आहे त्या प्रदेशाच्या सभोवती शंभर योजनात आपल्या माहात्म्याने अन्न-पानादिकांची प्राप्ति अतिशय सुलभतेने होते. अर्थात् दुष्काळ बिलकुल नसतो ।। ३६ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.orgPage Navigation
1 ... 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 159 160 161 162 ... 720